आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषद उतरणार ‘नियोजन’च्या आखाड्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हावार्षिक योजनेच्या आराखड्यात मागील वर्षीच्या तुलनेत जिल्हा परिषदेच्या निधीत सुमारे २३ कोटींची कपात प्रस्तावित केली. या प्रस्तावामुळे हादरलेल्या जिल्हा परिषदेने सोमवारी (१ फेब्रुवारी) होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत विरोध करण्याचा निर्णय घेतला. पालकमंत्री राम शिंदे यांच्या उपस्थितीत मागील सभेचे इतिवृत्त फेटाळण्याची तयारी पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषदेचे तथा नियोजन समितीच्या सदस्यांनी केली आहे. सभेपूर्वी विरोध करण्याची रंगीत तालीम शनिवारी (३० जानेवारी) जिल्हा परिषदेत होणार आहे.
जिल्हा परिषदेसाठी जिल्हा नियोजनच्या आराखड्यात निधी प्रस्तावित करण्यात आला आहे. हा निधी प्रस्तावित करताना जनसुविधांच्या कामांसह विविध योजनांच्या निधीत निम्म्याने कपात केली आहे. जिल्हा परिषदेत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीची सत्ता असतानाच मागील वर्षीच्या तुलनेत २३ कोटींची कपात झाल्याने सदस्य आक्रमक झाले आहेत. जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड पालकमंत्री शिंदे हे एकाच मतदारसंघातील असल्याने ही कुरघोडी केल्याची चर्चा जिल्हाभर रंगली. त्यातच जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी विरोध केला नसल्याचाही आरोप होत आहे. मागील सभेत निधीत कपात प्रस्तावित होत असताना पदाधिकारी, सदस्य गप्प का? होते असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

यापूर्वी निधीला कात्री लावल्याप्रकरणी अध्यक्ष गुंड यांच्यासह उपाध्यक्ष अण्णासाहेब शेलार, सभापती बाबासाहेब दिघे, शरद नवले, नंदा वारे यांच्या शिष्टमंडळाने नियोजन अधिकारी के. बी. जोशी यांच्याकडे वाढीव तरतूद करण्याची मागणी केली. मागील सभेत प्रस्तावित करण्यात आलेल्या कपातीसंदर्भात इतिवृत्त नांमजूर करण्यासाठी रणनिती आखली आहे. यापार्श्वभूमीवर शनिवारी दुपारी वाजता जिल्हा परिषद सभागृहात सभेची पूर्वतयारी मागण्यासंदर्भात सुची तयार करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निधी कपातीवरून नियोजन समितीची सभा वादळी होण्याची शक्यता आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत कपात
२०१४-२०१५ च्या तुलनेत २०१५-२०१६ वर्षातील प्रस्तावित तरतुदीत करण्यात आलेली कपात अशी : जनसुविधा कामे कोटी, तीर्थक्षेत्र कामे कोटी, राष्ट्रीय पेयजल कोटी, शाळा खोल्यांच्या इमारती कोटी, शाळा खोल्या दुरुस्ती कोटी, नवीन आरोग्य केंद्र बांधकाम कोटी, नवीन पशुवैद्यकीय दवाखाने बांधकाम अडीच कोटी, अंगणवाडी बांधकामे कोटींची कपात झाली.

आमचा विरोध
^जिल्हानियोजन समितीच्या सभेत प्रस्तावित कपातीला आम्ही विरोध करणार आहोत. याची पूर्वतयारी करण्यासाठी सदस्य पदाधिकारी शनिवारी बैठक घेणार आहोत. या बैठकीत सभेसाठीची विषय सूची, मागण्या त्या मान्य करण्यासाठी पत्र तयार करण्यात येणार आहे.'' मंजूषा गुंड, अध्यक्ष,जिल्हा परिषद