आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council Member, Latest News In Divya Marathi

जि.प.च्या शिलेदारांचे प्रस्थापितांना आव्हान, आठ सदस्य आणि सदस्यपती विधानसभेचे उमेदवार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव- जो आपल्या श्रद्धास्थानाचा अपमान करू शकतो, राजकारणासाठी लोकांच्या श्रद्धेला ठेच पोहोचवतो, महंतांचा अपमान करून खोटे गुन्हे दाखल करू शकतो, तो जनतेचे काय काम करणार आहे, असा सवाल करून मोनिका राजळेंच्या रूपाने तुम्ही कमळ फुलवा या भागाच्या विकासाची जबाबदारी मी घेते. परळी मतदारसंघ आणि बीड जिल्ह्याएवढेच लक्ष घालून पहिला शेवगाव-पाथर्डीचा विकास करणार, असा शब्द भाजपच्या नेत्या आमदार पंकजा मुंडे यांनी जनतेला दिला. उमेदवार पंकजा मुंडे समजून मोनिका राजळेंना विजयी करण्याचे आवाहन त्यांनी केले.
शेवगाव येथे खंडोबा मैदानावर भाजपच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचार सभेत त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा परिषद महिला बाल कल्याण समितीच्या माजी सभापती हर्षदा काकडे, सदस्य अशोक आहुजा, तालुकाध्यक्ष तुषार वैद्य, अरुण मुंडे, अशोक गर्जे, माजी आमदार दगडू बडे, बाळासाहेब सोनवणे, नितीन काकडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी आप, मनसे राष्ट्रवादीमधील शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपत प्रवेश केला. आमदार मुंडे म्हणाल्या, राज्यातील आघाडी सरकार मुळापासून संपुष्टात आणण्याचा चंग बांधला आहे. जनतेला बदल हवा आहे. लोकांनी निवडणूक हाती घेतली आहे. आम्हाला आता देश, राज्य घडवायचे आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवून तरुणांना रोजगार द्यायचा आहे. महिलांना सुरक्षा आणि सन्मान द्यायचाय. 2020 मध्ये देशाला महासत्ता बनवायचे आहे. महाराष्ट्राच्या माध्यमातून देशाचा विकास करण्याची मानसिकता आहे. राज्यात सत्ता मिळाली, तर दिल्लीचा विकास गल्लीपर्यंत पोहोचवायची आमची मानसिकता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने देशाला विकासाभिमुख नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वाखाली गोपीनाथ मुंडे यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र घडवायचा आहे. बाहेरच्या देशातून गुंतवणूक करून देशातील तरुणांना रोजगार देण्यासाठी गावोगावी उद्योग उभे करायचे आहेत. मुंडेंच्या जिवंतपणी जे त्यांना जमलं नाही, ते त्यांना आता काय मिळणार, असे आवाहन करत त्यांनी भाजप उमेदवार मोनिका राजळेंना विजयी करण्याचे आवाहन केले. गोपीनाथ मुंडेंचे आशीर्वाद आणि आमदार पंकजा मुंडे यांनी टाकलेला विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून विद्यमान लोकप्रतिनिधींनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न चालू आहे. राजकीय आकसाने भगवानगडाच्या गादीला धक्का लावण्याचे पाप समोरच्या उमेदवाराने केला आहे, असा आरोप उमेदवार मोनिका राजळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार चंद्रशेखर घुले यांचे नाव न घेता केला. यावेळी महादेव जानकर, भगवान सेनेचे डॉ. अजय फुंदे, दिनेश लव्हाट, वाय. डी. कोल्हे, अरुण मुंडे, बाल वक्ता अनिकेत गावडे आदींची भाषणे झाली. यावेळी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते तसेच सभेसाठी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

"ज्ञानेश्वर'ने शेतक-यांचे 2 हजार कोटी बुडवले
पूर्वी जिल्ह्यातील साखर कारखान्यांना ज्ञानेश्वर कारखान्याची धास्ती वाटायची. मात्र, आता ज्ञानेश्वर कारखान्याने 400 रुपयांच्या फरकाने इतर कारखांन्यापेक्षा कमी भाव दिला असून शेतकऱ्यांचे 2 हजार कोटी रुपये बुडवले आहेत. आता तेच पैसे निवडणूक प्रचाराच्या रूपाने वापरले जात आहे. घुलेंच्या बालेकिल्ल्याचे बुरूज ढासळल्याशिवाय राहणार नसून या निवडणुकीत घुलेंचा पराभव करा, असे आवाहन दिलीप लांडे यांनी केले.