आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपशिक्षणाधिका-यांवर कारवाईची शिफारस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- माहिती अधिकारात मागवलेली माहिती समाधानकारक न दिल्याने जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी तथा जनमाहिती अधिकारी गुलाब सय्यद यांच्यावर शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस राज्य महिती आयोगाने दिली.
अपंग विद्यार्थ्याचे पालक राजेंद्र दहातोंडे यांनी 25 फेब्रुवारी 2013 रोजी सय्यद यांच्याकडे माहिती अधिकारात अर्ज करून 1 ते 7 मुद्द्यांची माहिती मागितली होती. सय्यद यांनी 1 मार्च 2013 रोजी दहातोंडे यांना माहिती दिली. या माहितीने समाधान न झाल्याने त्यांनी प्रथम अपिलीय अधिकारी म्हणून तत्कालीन शिक्षणाधिकारी दिलीप गोविंद यांच्याकडे अपील केले. माहिती तातडीने देण्याचे आदेश गोविंद यांनी दिले होते. माहिती मिळाली नाही. यासंदर्भात सय्यद यांनी माहिती आयोगाच्या नाशिक खंडपीठाकडे सादर केलेला खुलासा अमान्य झाला. अपीलकर्त्याला तीस दिवसांच्या मुदतीत माहिती उपलब्ध करून देणे आवश्यक असताना सय्यद यांनी माहिती दिली नसल्याचे आढळून आले. त्यानुसार दहातोंडे यांना माहिती विनामूल्य उपलब्ध करून द्यावी, माहिती न दिल्याने सय्यद यांच्याविरुद्ध माहितीचा अधिकार अधिनियम 2005 च्या कलम 20(2) नुसार शिस्तभंगाच्या कारवाईची शिफारस करण्यात आली. ही कार्यवाही शिक्षणाधिकाऱ्यांनी करावी, असे आदेश माहिती आयुक्त पी. डब्ल्यु. पाटील यांनी दिले आहेत.