आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Council's 612 Schools Have Computer Software

जिल्हा परिषदेच्या 612 शाळांना मिळाले संगणक सॉफ्टवेअर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जिल्ह्यातील 612 शाळांना संगणकाचे सॉफ्टवेअर उपलब्ध करून देण्यात आले आहे. 2014-2015 या वर्षासाठी शैक्षणिक साहित्य व सॉफ्टवेअर बसवण्यासाठी 1 कोटी 20 लाखांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हा परिषद उपाध्यक्ष मोनिका राजळे यांनी दिली.


जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीची सभा नुकतीच राजळे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी सदस्य संभाजी दहातोंडे, परबत नाईकवाडी, सुरेखा राजेभोसले, नंदा भुसे, प्रवीण घुले आदी उपस्थित होते. शिक्षण विभागाचा आढावा यावेळी घेण्यात आला.


जिल्हा परिषदेने लोकसहभागातून शाळांचे संगणकीकरण केले, पण सॉफ्टवेअरचा प्रश्न प्रलंबित होता. टप्प्याटप्प्याने सॉफ्टवेअर देण्यात आले. आतापर्यंत 95 टक्के शाळांमध्ये सॉफ्टवेअर देण्यात आले आहे. त्यात 612 शाळांचा समावेश असून उर्वरित शाळांना आठवडाभरात सॉफ्टवेअर उपलब्ध करून दिले जाईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.
जिल्हास्तरीय गणित-विज्ञान प्रदर्शन 16 जानेवारीपासून र्शीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव येथे सुरू झाले आहे. त्यात सुमारे साडेचारशे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी पुढील वर्षी जिल्हा परिषदेच्या स्वनिधीतून नऊ लाखांची तरतूद करण्याचे राजळे यांनी सुचवले. चालू वर्षाच्या सुधारित व 2014-2015 वर्षाच्या मूळ अंदाजपत्रकातील प्रस्तावित कामांबाबत सभेत चर्चा झाली. शिक्षण साधन सामग्रीसाठी 1 कोटी 20 लाखांची तरतूद शिक्षण समितीने प्रस्तावित केली आहे. त्यामुळे शैक्षणिक साहित्य लवकरच मिळण्याचा मार्ग सुकर होईल.

2014-2015 साठी एवढी आहे तरतूद

जिल्हा शिक्षक पुरस्कार 2 लाख
विज्ञान प्रदर्शन 4 लाख
प्रज्ञाशोध परीक्षा सराव 15 लाख
शाळा खोल्या दुरुस्ती 25 लाख
प्रदर्शने (माध्यमिक) 2 लाख
संगणकांचे सॉफ्टवेअर 1.20 कोटी