आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालयात महिलांची कुचंबणा, महिलांच्या इंजेक्शन कक्षात पुरुषांवरही केले जातात उपचार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जिल्हा रुग्णालयात स्त्री इंजेक्शन कक्ष लिहिलेल्या खोलीत पुरुष महिला एकाचवेळी रांगा लावतात. - Divya Marathi
जिल्हा रुग्णालयात स्त्री इंजेक्शन कक्ष लिहिलेल्या खोलीत पुरुष महिला एकाचवेळी रांगा लावतात.
नगर - जिल्हाशासकीय रुग्णालयात पुरुष महिला रुग्णांसाठी स्वतंत्र इंजेक्शन कक्ष असल्याचे फलकावर नमूद करण्यात आले आहे. प्रत्यक्षात महिलांच्या इंजेक्शन कक्षातच पुरुषानांही इंजेक्शन दिले जाते. या प्रकारामुळे महिलांची कुचंबणा होत अाहे. महिलांसाठी स्वतंत्र कक्ष असावा किंवा पुरुषांना कक्षापासून विशिष्ट अंतरावर थांबवावे, असे त्यांचे म्हणणे आहे. 
 
जिल्हा रुग्णालयात दररोज शेकडो रुग्ण येतात. आलेल्या रुग्णाला केसपेपर काढण्यापासून आैषधे हातात पडेपर्यंत रांगा लावाव्या लागतात. रुग्णालयात होणारी गर्दी उपलब्ध मनुष्यबळ पाहता रांगा लावल्याशिवाय पर्याय नाही. ‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने शुक्रवारी (१ सप्टेंबर) रुग्णालयात इंजेक्शन कक्षासमोर सुमारे अर्धा तास निरीक्षण केले. 
 
रुग्णालयात प्रवेश केल्यानंतरच उजव्या बाजूला इंजेक्शन कक्ष आहेत. सहा क्रमांकाच्या कक्षावर ‘पुरुष इंजेक्शन कक्ष’ असा फलक आहे. शेजारच्या पाच क्रमांकाच्या कक्षावर ‘स्त्री इंजेक्शन कक्ष’ असा फलक आहे. प्रथमदर्शनी दोन स्वतंत्र कक्ष असल्याचे दिसते. प्रत्यक्षात पाच क्रमांकाच्या महिलांच्या कक्षातच पुरुषांनाही इंजेक्शन दिले जाते. या कक्षात एक खाट असून पडदा ओढून रुग्णाला कंबरेवर इंजेक्शन दिले जाते. दंडावर द्यायचे असेल, तर खाटेच्या समोरच बसवून रुग्णाला इंजेक्शन दिले जाते. कक्षाच्या दरवाजातच महिला पुरुषांच्या रांगा लावल्या जातात. खाटेवरचा रुग्ण महिला असेल किंवा खाटेसमोरच्या बाजूला इंजेक्शनसाठी बसवलेला पुरुष असेल, तर महिलांची कुचंबणा होते. काही महिलांनी नाव घेण्याच्या अटीवर हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगितले. सहा क्रमांकाच्या पुरुष इंजेक्शन कक्षाच्या फलकावर नव्याने ‘ओपीडी ड्रेसिंग रुम’ असे लिहिण्यात आले आहे. 
 
शल्यचिकित्सकांचे लक्ष वेधले 
महिलापुरुषांना एकाच कक्षात इंजेक्शन दिले जात असल्याकडे दैनिक दिव्य मराठीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पी. बी. बुरुटे यांचे लक्ष वेधले. त्यावर त्यांनी जर यापूर्वी स्वतंत्र कक्ष असतील आपण तत्काळ तसे कक्ष करू, असे सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...