आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपाच्या शेवटच्या दिवशी रुग्णांचे हाल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शासकीय डॉक्टरांच्या संपामुळे जिल्हा रुग्णालयातील रुग्णांचे सोमवारी हाल झाले. डॉक्टरांच्या अनुपस्थितीमुळे नातेवाईकांनाच रुग्णांची काळजी घ्यावी लागली. 1 जुलैपासून सुरू असलेला संप डॉक्टरांनी सोमवारी मागे घेतला. मंगळवारपासून (8 जुलै) वैद्यकीय सेवा सुरळीत होईल, अशी माहिती रुग्णालय प्रशासनाकडून देण्यात आली.
विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी शासकीय वैद्यकीय अधिकारी संपावर गेले होते. रुग्णालयाच्या आवारात मंडप टाकून डॉक्टरांची निदर्शने सुरू होती. जिल्हा रुग्णालयातील 23 व रुग्णालयांतर्गत येणा-या ग्रामीण दवाखान्यांतील 19 वैद्यकीय अधिकारी संपावर होते. सोमवारी दुपारनंतर संप मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मात्र, संपात सहभागी एकही डॉक्टर दुपारनंतर हजर झाला नव्हता. कडक कारवाई करण्याच्या आरोग्य विभागाच्या आदेशाची अंमलबजावणीही सोमवारी झाली नाही. डॉक्टर नसल्याने ओपीडीही ओस पडली. नातेवाईकांनाच रुग्णसेवा करावी लागली. डॉक्टर संपावर असल्याने कर्मचारीही निर्धास्त होते. याचा फटका रुग्णांना बसला.

आंदोलनामुळे सेवा विस्कळीत झाली. मात्र, रुग्णांना त्रास होणार नाही याची काळजी घेतली, इमर्जन्सी सेवा व शस्त्रक्रिया विभागात डॉक्टर होते, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक एस. एम. सोनवणे यांनी दिली.