आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्हा रुग्णालय : सरकारी की खासगी?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- जिल्हा रुग्णालयाचा कारभार काही केल्या सुधारायला तयार नाही. साप चावलेल्या रुग्णावर उपचार करण्याचे सोडून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने त्याला खासगी रुग्णालयात घेऊन जाण्याचा सल्ला देत तसे प्रयत्नही गुरूवारी केले. त्यामुळे जिल्हा रुग्णालय सर्वसामान्य रुग्णांसाठी आहे की, खासगी रूग्णालयांत रुग्ण पाठवण्यासाठी आहे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
नेवासे तालुक्यातील भैरवाडी येथील अलका यादव माळी यांना गुरूवारी सकाळी साडेआठच्या सुमारास सर्पदंश झाला. त्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात आणले. साडेअकराच्या सुमारास त्यांना रूग्णालयात आणल्यानंतर सुरुवातीला डॉक्टरच उपस्थित नव्हते. त्यानंतर आलेल्या प्रशिक्षणार्थी डॉक्टरने अतिदक्षता विभागात जागा नसल्याचे कारण पुढे करत रुग्णाला खासगी रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. एवढ्यावरच न थांबता या डॉक्टरने खासगी डॉक्टरला फोन करून त्यांना तिकडे पाठवण्याचा प्रयत्न केला. नगरसेवक अजिंक्य बोरकर यांच्या प्रयत्नांमुळे शेवटी उपचार झाले.
बेजबाबदार प्रशासन
घटनेसंदर्भात माहिती घेण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एस. एम. सोनवणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मनुष्यबळाबाबत माहिती घेण्यासाठी प्रशासन अधिकारी संजय राठोड यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही फोन कट केला.