आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जिल्‍हा रुग्णालयात रुग्णांच्या जीवाशी खेळ, प्रशिक्षणार्थी डॉक्टरांच्या भरवशावर रुग्ण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- शहर व जिल्‍ह्यात साथीच्या रोगांनी थैमान घातले असताना जिल्हा रुग्णालय सतर्क झालेले नाही. तज्ज्ञ डॉक्टरांऐवजी प्रशिक्षणार्थींच्या भरवशावर कारभार सुरू आहे. मंगळवारी सकाळी केलेल्या पाहणीत हे वास्तव उघडकीस आले. ग्रामीण भागातही रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत रुग्णालय प्रशासनाने अधिक सतर्क असण्याची अपेक्षा होती. मात्र, रुग्णालयाचा कारभार सुधारायला तयार नाही. मंगळवारी दुपारी मेडिसिन ओपीडीचे वर्ग एकचे वैद्यकीय अधिकारी व जनरल ओपीडीचे वर्ग दोनचे वैद्यकीय अधिकारी दालनासमोर रुग्णांची गर्दी होती. मात्र, मेडिसिन ओपीडीत एकही डॉक्टर उपस्थित नव्हता. जनरल ओपीडीत केवळ एक प्रशिक्षणार्थी डॉक्टर होता. त्यामुळे ताटकळलेल्या रुग्णांनी संताप व्यक्त केला.
काविळीच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी महापालिकेची यंत्रणा तोकडी पडत असल्याने जलि्हा रुग्णालयात स्वतंत्र वॉर्ड राखीव ठेवण्यात आला आहे. मंगळवारपासून या रुग्णांसाठी स्वतंत्र ओपीडी सुरू करण्यात आली. या ओपीडीसाठी तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध करून दिल्‍याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मात्र, प्रत्यक्षात प्रशिक्षणार्थीकडून उपचार सुरू होते. काविळीसाठी उघडण्यात आलेल्या वॉर्डात सध्या ९ रुग्ण दाखल आहेत. सात रुग्णांना उपचारांनंतर घरी सोडण्यात आले.