आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेमधील कर्मचा-यांवर कारवाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेत काम करत असताना कर्मचा-यांच्या बेशिस्तप्रकरणी प्रशासकीय कारवाई केली जाते, त्याचाच एक भाग म्हणून जून ते २२ जून या कालावधीत तीन कर्मचा-यांवर प्रशासनाने निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच दोन कर्मचा-यांवर वेतनवाढ थांबवण्याची कारवाई केली आहे.
जिल्हा परिषदेत काम करत असताना कामातील हलगर्जीपणा अथवा तांत्रिक अडचणींमुळे अनेकवेळा कर्मचारी अडचणी येत असतात. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवरून कारवाई केली जाते.
जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाकडे विभागप्रमुखांमार्फत संवर्गातील कर्मचा-यांवरील कारवाईच्या फाईल पाठवल्या जातात. गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेल्या बहुतेक फाईल मागील आठवड्यात निकाली काढण्यात आल्या आहेत. तसेच ज्या कर्मचा-यांचे निलंबन केले होते, अशा कर्मचा-यांना पुन्हा कामावरही घेण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. देहरे आरोग्य केंद्रातील कनिष्ठ सहाय्यक पी. जी. आल्हाट, कर्जत तालुक्यातील चापडगाव आरोग्य केंद्रातील कर्मचारी एस. ई. बोरुडे, राहुरी तालुक्यातील उंबरे येथील परिचर भाऊसाहेब बर्डे यांना प्रशासनाने निलंबित केले आहे.
आरोग्य विभागातील डी. ए. डोईफोडे, बी. ए. गटकळ, डी. बी. गाढे यांच्या दोन वेतनवाढी तात्पुरत्या बंद केल्याची माहितीही जिल्हा परिषद प्रशासनाकडून समजली. याव्यतिरिक्त तीन कर्मचा-यांवरील कारवाई अंतिम टप्प्यात असल्याचे अधिका-यांकडून समजले. कामात हलगर्जीपणा करून कार्यालयीन वेळेत हजर राहणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही आता कारवाई केली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...