आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • District Legislative Will Find School Going Student

विद्यार्थ्यांच्या बोटाला शनिवारी लागणार शाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - शाळाबाह्य मुलांचा शोध घेण्यासाठी जिल्हा परिषदेमार्फत शनिवारी (४ जुलै) शाळाबाह्य मुलांची शोधमोहीम राबवण्यात येणार आहे. शाळाबाह्य मुले शोधताना अडचण होऊ नये, म्हणून जे विद्यार्थी शाळेत शिक्षण घेत आहेत, त्यांच्या बोटाला त्याच दिवशी काळी शाई लावण्यात येईल. घरोघरी जाऊन ज्या मुलांच्या बोटाला शाई नसेल, अशा शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शाळेत दाखल केले जाणार आहे.

शासकीय कर्मचा-यांच्या सहकार्याने राज्यभरात शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. दरवर्षी शिक्षण विभागामार्फत शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना वयानुसार वर्गात दाखल केले जाते. स्थलांतरित, ऊसतोडणी मजूर, भटकी कुटुंबे आदींची मुले शाळाबाह्य मोहिमेत शोधली जाणार आहेत. एकही मुलगा किंवा मुलगी शिक्षणापासून वंचित राहू नये, या उद्देशाने राज्याच्या शिक्षण विभागाने ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेसाठी प्राथमिक माध्यमिक शिक्षण विभागांतर्गत कार्यरत असलेल्या शिक्षकांची मदत घेतली जाणार आहे. जिल्हाभरातील सुमारे १४ हजार शिक्षक शनिवारी घरोघरी जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेणार आहेत. जिल्ह्यात ५० ते १०० कुटुंबामागे एक शिक्षक या प्रमाणात हे सर्वेक्षण केले जाणार आहे, असे जिल्हा परिषद प्रशासनाने सांगितले. आढळून आलेल्या मुलांना जवळच्या शाळेत दाखल केले जाईल. या उपक्रमामुळे जि. प. शाळांचा पट वाढेल.

हे उपाय करावे लागतील
शाळास्तरावरगुरुवारी (२ जुलै) पालकांची बैठक घेऊन ग्रामपंचायतीमार्फत दवंडी देऊन शुक्रवारी (३ जुलै) शनिवारी (४ जुलै) विद्यार्थ्यांनी गैरहजर राहू नये, असे आवाहन व्यवस्थापनाने करावे. तसेच शुक्रवारीच हजर असलेल्या शालेय विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावावी. शनिवारी उर्वरित विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावावी. असे केले, तरच शालेय विद्यार्थ्यांना शाई नसल्याच्या कारणास्तव शाळाबाह्य ठरवण्याच्या प्रकाराला काही प्रमाणात आळा घालता येईल, असे शिक्षण क्षेत्रातील जाणकारांनी दैनिक दिव्य मराठीशी बोलताना सांगितले.

...तर आकडा चुकेल
प्रवेशघेऊन दररोज शाळेत जाणा विद्यार्थ्यांपैकी १० ते १५ टक्के विद्यार्थी आजारपण, घरगुती अडचणीमुळे दररोज गैरहजर राहतात. शनिवारी विविध शाळांमध्ये दररोज येणारे, पण शनिवारी गैरहजर राहिलेल्या मुलांच्या बोटाला शाई लावता येणार नाही. त्याच दिवशी शोधमोहीम असल्याने दररोज शाळेत जाणारे पण मोहिमेच्या दिवशी गैरहजर राहिलेले विद्यार्थीदेखील घरी आढळून येतील. त्यांना शाळाबाह्य म्हणून समजण्याची शक्यताच अधिक आहे. असे झाले, तर शाळाबाह्य मुलांचा नेमका आकडा शोधणे कठीण होईल.

शाळाबाह्य मुलांना शाळेत दाखल करू
शाळाबाह्य मुलांच्या शोध मोहिमेंतर्गत जुलैला सकाळपासून सायंकाळी सहापर्यंत शाळाबाह्य मुलांचा शोध घेतला जाणार आहे. जिल्हाभरातील सुमारे १४ हजार शिक्षक घरोघर जाऊन शाळाबाह्य मुलांचा शोध घेतील. शाळेतील विद्यार्थ्यांच्या बोटाला शाई लावलेली असल्याने शाई नसलेल्या मुलांची चौकशी करून शाळाबाह्य असल्यास त्यांना शाळेत दाखल करण्यात येईल.'' शैलेशनवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी.