आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलस्त्रोतांच्या दुरुस्तीसाठी पथदर्शी प्रकल्प राबवणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जलस्त्रोतांच्या दुरुस्तीसाठी जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प राबवण्यात येणार असून, हा प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यात या प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाईल, अशी माहिती पालकमंत्री राम शिंदे यांनी सोमवारी दिली. 
 
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत शिंदे बोलत होते. जिल्ह्यात जे बंधारे, तलाव नादुरुस्त आहेत, त्यांच्या दुरुस्तीसाठी लवकरच पथदर्शी प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे. हा प्रकल्प यशस्वी झाल्यास त्याचा दुष्काळी भागाला मोठा लाभ होईल. या प्रकल्पानंतर संपूर्ण राज्यात अशा प्रकारचे प्रकल्प राबवण्यात येतील. त्यासाठी २७५ कोटी खर्चाचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येणार आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

जिल्हा वार्षिक योजनेचा सन २०१७-१८ या वर्षासाठी ५४० कोटींचा प्रारुप आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्याला मंजुरी देण्यात आली. यंदा आराखड्यात ३५ कोटी ४९ लाखांची वाढ करण्यात आली. सर्वसाधारण योजना, आदिवासी उपाययोजना अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी हा आराखडा आहे. सर्वसाधारण योजनेसाठी १७ कोटी १५ लाख, आदिवासी उपाययोजनांसाठी कोटी ७३ लाख, अनुसूचित जाती उपाययोजनांसाठी १५ कोटी ६१ लाखांची वाढ करण्यात आली. 

जिल्हा वार्षिक योजनेच्या २०१६-१७ या वर्षासाठी मंजूर झालेला शंभर टक्के निधी राज्य सरकारकडून प्राप्त झाला असून, ९५ टक्के कामांना मंजुरी देण्यात आली आहे. ७५ टक्के निधी वितरित झाला आहे. केंद्र सरकारकडून योजनांसाठी येणारा सर्व निधी आल्याने काही विभागांना निधीचे वितरण प्रलंबित आहे. २०१६-१७ च्या वार्षिक योजनेंतर्गत कृषी विभागासाठी ३७ लाख, वनविभागासाठी कोटी २८ लाख, मध्यवर्ती रोपमळ्यासाठी ६६ लाख, वनक्षेत्रामधील मृद जलसंधारण कामासाठी ८१ लाख, आरोग्य विभागासाठी कोटी ७७ लाख, मत्स्य व्यवसायासाठी लाख, तंत्रशिक्षण विभागासाठी २५ लाख, तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी कोटी ९२ लाख रुपयांची वाढीव तरतूद करण्यात आली होती. 

यंदाच्या वार्षिक आराखड्यात कृषी विभागासाठी कोटी ८९ लाख, मृद संधारणासाठी १० कोटी, वनक्षेत्रातील कामासाठी १० कोटी ४० लाख, पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेसाठी कोटी, ग्रामपंचायतीच्या सुविधांसाठी कोटी, तीर्थक्षेत्रांसाठी कोटी, जलसंधारणासाठी १४ कोटी, रस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी २४ कोटी १५ लाख, ग्रामीण विकास रस्ता योजनेसाठी १५ कोटी, नगरविकास विभागाच्या नगरोत्थान महाअभियानासाठी कोटी, नागरी वस्ती सुधारणा योजनेसाठी कोटी, अंगणवाड्यांच्या बांधकामासाठी कोटी, प्राथामिक आरोग्य केंद्रांसाठी कोटी, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेसाठी ४८ कोटी २३ लाख, िनर्मल भारत अभियासाठी ५६ कोटी ४६ लाख ग्रामीण नळ पाणी पुरवठा योजनांसाठी ३५ कोटी ७८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे, असे शिंदे यांनी सांगितले. 

जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यातील श्रीराष्ट्रसंत तनपुरे महाराज देवस्थान (दगडवाडी, ता. पाथर्डी), यमाईमाता मंदिर देवस्थान (जेऊर हैबती, ता. नेवासे), भैरवनाथ महाराज देवस्थान (बेलवंडी, ता. श्रीगोंदे), गुप्तनाथ खंडोबा मंदिर देवस्थान (खेड, ता. कर्जत), गोविंद महाराज देवस्थान (निमगाव डाकू, ता. कर्जत), येळेश्वर संस्थान (येळी, ता. पाथर्डी), खंडेश्वर देवस्थान (दैठणे गुंजाळ, ता. पारनेर) या तीर्थस्थळांचा वर्ग तीर्थक्षेत्रात समावेश करण्यात आला आहे. 

बैठकीस खासदार दिलीप गांधी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंजूषा गुंड, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, महापौर सुरेखा कदम, जिल्हाधिकारी अनिल कवडे, जिल्हा पोलिसप्रमुख डॉ. सौरभ त्रिपाठी आदी उपस्थित होते. 

अनेक आमदारांची बैठकीला दांडी 
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीला नेहमीप्रमाणेच अनेक आमदारांनी दांडी मारली. बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, विजय आैटी भाऊसाहेब कांबळे उपस्थित होते. उर्वरित आमदार मात्र बैठकीकडे फिरकले नाहीत. सकाळी नऊ वाजता ही बैठक असल्यामुळे अनेक आमदार येऊ शकले, नाहीत, अशी चर्चा होती. 

जि. प. पदाधिकाऱ्यांनी केला सभात्याग 
जिल्हा परिषदेला जाणीवपूर्वक कमी निधी दिल्याचा आरोप करत पदाधिकाऱ्यांनी सभात्याग केला. त्यावर पालकमंत्री म्हणाले, गेल्या वर्षी जि. प. ला पाणी, आरोग्य, रस्ते अशा योजनांसाठी २३४ कोटी दिले होते. मात्र, त्यातील ११९ कोटी खर्च झाले नाहीत. हा निधी परत जाऊ नये, यासाठी तो दुसऱ्या योजनांसाठी वळवण्यात आला. 

स्वबळाचा निर्णय होईल योग्य वेळी 
जि. प. निवडणूक स्वबळावर लढवण्याबाबत विचारले असता याबाबत मी योग्य वेळी बोलेन, असे सांगून मंत्री शिंदे यांनी हा विषय टाळला. भाजप बैठकीत संघटनमंत्री किशोर काळकर यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याबाबत केलेल्या व्यक्तव्याविषयी विचारले असता ते म्हणाले, मी पालकमंत्री आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...