आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरमहा लाख २२ हजारांचा बसतो भुर्दंड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा परिषदेच्या शाळांमधील शिक्षक हे जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे सभासद आहेत. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचे हप्ते जिल्हा परिषदेमार्फतच कपात केले जातात. तथापि, पगार वेळेवर होत नसल्याने हप्तेकपातीलाही विलंब होतो. विलंबाच्या कालावधीत व्याजावर पुन्हा व्याज आकारले जात असल्याने शिक्षकांना भुर्दंड बसतो. त्यातच जिल्हा परिषदेने बँकेच्या वार्षिक सभेतील गोंधळाबाबत कारवाईसाठी चित्रीकरण मागवले आहे. जर कारवाई करायची असेल, तर दिरंगाईमुळे होणाऱ्या भुर्दंडाची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, असा सूर शिक्षक वर्गातून निघत आहे.
प्राथमिक शिक्षक बँकेचे १० हजार ९३१ सभासद आहेत. पगारदार संस्था असल्याने या संस्थेच्या थकबाकीदारांचे प्रमाण कमी आहे. सध्या बँकेकडून कर्जावर ११ टक्के व्याज आकारले जाते. कर्जदार सभासद मरण पावला, तर बँक संबंधिताचे संपूर्ण कर्ज माफ करते. त्यामुळे अपवाद वगळता कर्जदार शिक्षकांची संख्या हजार ७०० वर पोहोचली आहे. एक शिक्षक सभासद साधारणपणे सात ते दहा लाखांपर्यंत कर्ज उचलतो. या कर्जाची परतफेड शंभर हप्त्यांपर्यंत केली जाते. साधारणपणे दहा लाखांच्या कर्जावर हजार १६६ व्याज कर्जाचा हप्ता १० हजार असे सुमारे १९ हजार दरमहा द्यावे लागतात. कायम ठेव मृत निधीचे विचारात घेता कर्जदार शिक्षकांच्या पगारातून दरमहा २० हजारांपर्यंत कपात होते.

कर्जाचा हप्ता थेट पगारातून कपात करण्यासाठी बँक जिल्हा परिषदेचे कर्मचारी असलेल्या केंद्रप्रमुखांना हप्ता कपातीची यादी पाठवते. त्यात व्याजासह हप्त्याची रक्कम नोंदवलेली असते. तथापि, उशिरा होणाऱ्या पगारामुळे कर्जाचा हप्ता वेळेत जात नसल्याने व्याज हप्त्याच्या रकमेवरच पुन्हा विलंबापर्यंतच्या दिवसाचे व्याज आकारले जाते. प्रशासनाच्या या दिरंगाईचा फटका शिक्षकांना बसतो.

बँकेच्या धोरणांमध्ये सभासद हित आणण्यासाठी सत्ताधाऱ्यांबरोबरच विरोधकही आक्रमक असतात. त्याचे पडसाद सर्वसाधारण सभेत उमटतात. त्यात शिक्षक बँक सभेतील गोंधळाबद्दल बदनाम आहे. नुकत्याच झालेल्या सभेत शिक्षकांनी मोठा गोंधळ घातला. जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या या कृतीमुळे बदनामी झाल्याची आवई उठवली आहे. त्यामुळे हुल्लडबाज शिक्षकांवर कारवाई करण्याबाबत चाचपणी सुरू आहे. त्यासाठी बँकेच्या सभेचे चित्रिकरण मागवण्यात आले आहे. शिक्षकांवर प्रशासनाने कारवाई करावी, पण पगाराला होणाऱ्या दिरंगाईची जबाबदारी स्वीकारून चक्रव्याढ व्याजापोटी शिक्षकांना बँकेकडून बसणाऱ्या भुर्दंडाचीही जबाबदारी घ्यावी, असा सूर शिक्षक आळवत आहेत. त्यामुळे शिक्षक कर्मचारी जिल्हा परिषद प्रशासन यांच्यात जुंपणार आहे. पदाधिकाऱ्यांनी कार्यकाळ संपण्याच्या शेवटच्या टप्प्यात शिक्षकांवर कारवाईचा बडगा उगारण्याचा इशारा दिल्याने शिक्षकांचा संताप होऊन ते रस्त्यावर उतरण्याची चिन्हे आहेत.
ठेवीतून हप्ता वर्ग करावा...
^वर्षभरवेळेतपगार झाले नाहीत. मागील महिन्यात पगार सुरळीत झाले. पण बँकेकडून व्याजावर व्याज आकारले जात असल्याने भुर्दंड बसतो. जिल्हा परिषदेमुळे हा फटका बसतो. आमच्या या भुर्दंडाचीही जबाबदारी त्यांनी घ्यावी. बँकेने सभासदांच्या ठेवीतून हप्ता वर्ग करावा.’’ संजय कळमकर, शिक्षक नेते.

एक महिना पगार उशिरा झाल्यास हजार १६६ रुपये व्याजावर पुन्हा व्याज आकारले जाते. त्यापोटी एका शिक्षकाला दरमहा ८३ रुपये भुर्दंड बसतो. असे हजार ७०० कर्जदार आहेत. या सर्वांना एकूण लाख २२ हजार १०० रुपयांचा भुर्दंड भरावा लागतो.
बँक चक्रव्याढ व्याज घेत नाही
^बँकचक्रव्याढव्याज आकारत नाही. इतर सर्व बँकांप्रमाणे बँक कर्जाचे व्याज महिनाअखेर कर्जात जमा करून कर्जबाकी दाखवली जाते. एका शिक्षकाला महिन्याला ८२ रुपयांपेक्षा जास्त व्याजावर व्याज येत नाही. पगार वेळेत झाले, तर हे व्याज आकारण्याची गरज पडणार नाही.'' अरुण देशमुख, सचिव, शिक्षक बँक.
बातम्या आणखी आहेत...