आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा वर्षात अवघी ५६ टक्के कर्जवसुली, थकीत ग्रामपंचायतींना बजावणार नोटिसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा ग्रामविकास निधी अंतर्गत ग्रामपंचायतींना कर्ज दिले जाते, परंतु दहा वर्षांपूर्वी कर्ज घेतलेल्या १९ ग्रामपंचायतींकडून अवघी ५६ टक्के वसुली झाली आहे. मुदत संपूनही शंभर टक्के कर्जाचा भरणा झाल्याने जिल्हा परिषद संबंधित ग्रामपंचायतींना नोटिसा बजावण्याच्या तयारीत आहे.

जिल्ह्यात सुमारे हजार २८० ग्रामपंचायती आहेत. त्यावर जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाचे नियंत्रण आहे. ग्रामपंचायत स्तरावर पाणी पट्टी, घरपट्टी इतर करांची वसुली केली जाते. या वसुलीच्या माहितीची नोंद जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागात ठेवली जाते. एकूण वसुलीच्या २५ टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे ग्रामविकासासाठी उपलब्ध आहे. हा निधी सद्य:स्थितीत १३ कोटींवर आहे. या निधीतून ज्या ग्रामपंचायती सक्षम नाहीत, अशा ग्रामपंचायतींना ग्रामनिधी अंतर्गत अवघ्या टक्के दराने कर्जपुरवठा केला जातो. परत फेडीची मुदत दहा वर्षांपर्यंत आहे. या निधीतून ग्रामपंचायती गावात शॉपिंग सेंटर, ग्रामपंचायत इमारत, अंतर्गत रस्ते, सार्वजनिक शौचालये, शाळा खोली आदी कामे घेतली जातात. यासाठी ग्रामपंचायतीकडून प्रस्ताव आल्यानंतर सर्वसाधारण सभेत कर्जाचा विषय मंजुरीसाठी ठेवला जातो. जिल्ह्यातील १९ ग्रामपंचायतींनी दहा वर्षांपूर्वी सुमारे ७६ लाख हजार २९३ रुपयांचे कर्ज घेतले. यापैकी बहुतेक ग्रामपंचायतींनी ५० टक्केच कर्जाचा भरणा जिल्हा परिषदेकडे केला आहे. कमी व्याजदर असताना ग्रामपंचायतीकडून कर्जाचा भरणा वेळेत होत नसल्याने ग्रामपंचायत विभागाची डोकेदुखी वाढली आहे. यापार्श्वभूमीवर उपमुख्यकार्यकारी अधिकारी संगीतादेवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ सहायक लेखा के. एस. छाजेड वसुलीसाठी प्रयत्नशील आहेत. ज्या ग्रामपंचायती मुदतीत कर्जाचा भरणा करीत नाहीत, अशा ग्रामपंचायतींवर कारवाई करण्याची भूमिका जिल्हा परिषद घेणार आहे. त्यामुळे वेळेत कर्जाचा भरणा केला नाही, तर कर्जधारक ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक अडचणीत येण्याची शक्यता आहे. ग्रामपंचायत विभागाकडून खासगीत मिळालेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील गणोरे, कोळपेवाडी, पोहेगाव, सांगवी भुसार, येसगाव, सोनगाव, सुरेशनगर, टाकळी मानुर, बहिरोबावाडी, अळसुंदे, निमगाव गांगर्डा, कोंभळी, पारगाव सुद्रीक, अपधुप, पारगावमौला, देऊळगाव सिद्धी आदी १९ ग्रामपंचायतींकडे ३४ लाख ६३ हजार ९१८ थकबाकी आहे. या कर्जाचे व्याज २६ लाख ७३ हजार ९७६ रुपये थकीत आहे. ग्रामपंचायतींनी वेळेत कर्जाचा भरणा केला नाही, तर संबंधित ग्रामपंचायतीवर दंडात्मक कारवाईचीही तरतूद आहे. त्यामुळे जिल्हा परिषद कारवाईची भूमिका घेणार असल्याचीही माहिती समजली.

तालुकानिहाय थकीत ग्रामपंचायती
अकोले २, कोपरगाव ४, श्रीरामपूर १, राहुरी १, नेवासे १, पाथर्डी १, कर्जत ४, श्रीगोंदे १, पारनेर नगर तालुक्यातील ग्रामपंचायतींकडे थकबाकी आहेत. या ग्रामपंचायतींनी कर्जाचा भरणा त्वरित करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत.