आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

५८३ कामे पूर्ण असूनही पूर्णत्वाचा दाखला नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हा समाज कल्याण विभागामार्फत अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्तीचा विकास करण्याची योजना राबवली जाते. या योजनेंतर्गत ५८३ वस्त्या पूर्ण होऊनही बांधकाम विभागाच्या उदासीनतेमुळे पूर्णत्वाचा दाखला मिळालेला नाही. संबंधित बेजबाबदार बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे धाडस मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दाखवणार का, असा प्रश्न सामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. 
 
ग्रामीण भागातील अनुसूचित जाती नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांची संख्या साडेतीन हजारांवर आहे. समाजकल्याण विभागामार्फत या वस्त्यांचा विकास करण्यासाठी विविध कामे केली जातात. दरवर्षी वस्त्यांच्या निधीच्या खर्चावरून सदस्यांमधून नाराजी व्यक्त होत असते. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण अधिकाऱ्यांनीही याकडे लक्ष दिलेले नाही. 

जिल्ह्यात दरवर्षी सुमारे पाचशे ते एक हजार कामे केली जातात. या कामांसाठी नव्वद टक्के निधी उपलब्ध करून दिला जातो. या निधीत कामे भौतिकदृष्ट्या पूर्ण केली जातात. त्यानंतर संबंधित बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी स्थळ पाहणी करून पूर्णत्वाचा दाखला देणे आवश्यक असते. त्यानंतर उर्वरित दहा टक्के रक्कम अदा केली जाते. तथापि, दहा टक्के रकमेसाठी गरजवंतांचे घोडे अडत नसल्याने पूर्णत्वाचा दाखाल रखडला असल्याची चर्चा आहे. 
जिल्ह्यात २००८ ते २०१६ या कालावधीत हजार ८७९ कामांना मंजुरी मिळाली होती. त्यापैकी हजार ४८६ कामे पूर्ण असून त्याला पूर्णत्वाचा दाखला अदा करण्यात आला. अजूनही ५८३ कामांना पूर्णत्वाचा दाखला दिलेला नाही. त्यामुळे या कामांची दहा टक्के रक्कम प्रलंबित आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे यांनीही दुर्लक्ष केल्याने हा प्रश्न जेसे थे आहे. यासंदर्भात प्रशासकीय पातळीवर दखल घेऊन दोषींवर कारवाई करण्याचे धाडस मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दाखवावे, अशी मागणी सामान्य नागरिकांमधून होत आहे. 

आठ वर्षांपासून दाखले नाहीत 
जिल्ह्यात २००९ ते २०१३ या कालावधीत २३ कामांना पूर्णत्वाचे दाखले दिले गेले नाहीत. सन २०१५ पासून ३५३ २०१६ मधील १८३ कामांना पूर्णत्वाचे दाखले दिलेले नाहीत. मागील अनेक वर्षांपासून प्रशासकीय सोपस्कर पूर्ण होऊ शकलेले नाहीत. 

दीड हजार कामे रखडली 
जिल्ह्यात मागील आठ वर्षांपासून अनेक कामे मंजूर होऊनही अपूर्ण आहेत. सन २०१३ पासून कामे रखडण्याचे प्रमाण वाढले आहे. आतापर्यंत जिल्ह्यात हजार ६२२ कामे मंजूर असूनही पूर्ण होऊ शकलेलीे नाहीत. ही कामे मंजूर झाल्यानंतर पुन्हा पूर्णत्वाच्या दाखल्यासाठी रखडण्याची शक्यता आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...