नगर - पोलिसांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी त्यांनी क्रीडा प्रकारांमध्ये निपुण असणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन न्यायाधीश जोशी यांनी केले. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित जिल्हास्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेचे सर्वसाधारण विजेतेपद पोलिस मुख्यालय संघाने पटकावले.
जिल्हाधिकारी अनिल कवडे, पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी जिल्हा न्यायाधीश विनय जोशी यांच्या हस्ते स्पर्धेतील क्रीडा प्रकारांमध्ये सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा गौरव करण्यात आला. २१ जुलैला झालेल्या कबड्डी स्पर्धेत पोलिस मुख्यालय संघाने नगर शहर संघावर १४ गुणांनी विजय मिळवला. इतर निकाल-भालाफेक पुरुष-गजानन गायकवाड, रामहरी तिडके. महिला- मनीषा निमोणकर, रुपाली लोहाळे. थाळीफेक पुरुष-गजानन गायकवाड, अमोल गाडे. महिला-मनीषा निमोणकर, स्वाती तुपे. गोळाफेक पुरुष-अमोल गाडे, गजानन गायकवाड. महिला-मनीषा निमोणकर, शुभांगी निर्मळ. व्हॉलिबॉल महिला- संगमनेर विजयी. महिला बास्केटबॉल- पोलिस मुख्यालय १२ गुणांनी विजयी.
२२ जुलैचा निकाल-८०० मी. धावणे पुरुष-रामहरी तिडके, संतोष मगर. महिला- रंजना डांगे, रुपाली लोहाळे. १५०० मी. धावणे-अमृत आढाव, रोहित डवाळे. महिला- रुपाली लोहाळे, छाया गायकवाड. ५००० मी. धावणे पुरुष-अमृत आढाव, भगवान थोरात. महिला-रुपाली लाेहाळे, रंजना डांगे. १०,००० मी. धावणे पुरुष- गणेश बोरसे, अमोल भांड. तिहेरी उडी पुरुष-बाबासाहेब कोरेकर, रोहित डवाळे. उंच उडी पुरुष-बाबासाहेब कोरेकर, संदीप गर्जे. उंच उडी महिला-मनीषा निमोणकर, आसरी शिंदे. लांब उडी पुरुष-रुपाली राजगिरे, आसरी शिंदे.
बास्केटबॉल पुरुष-संगमनेर संघ विजयी. व्हॉलिबॉल पुरुष-श्रीरामपूर संघ. बॉक्सिंग स्पर्धा-५०-६० किलो-रोहित डवाळे, गणेश मिसाळ. ६०-६४ किलो- सोमनाथ राऊत, भगवान थोरात. ६४-६९ किलो-अशोक पुंड, धीरज अभंग. ६९-७५ किलो-अतुल काजळे, सुयोग सुपेकर. ७५-८१ किलो-फारूख मन्यार, खंडेराव शिंदे. ८१-९१ किलो-सुजय हिवाळे, मनोज गुंजाळ. ५०-५२ किलो-बबिता खडसे. ५४-५७ किलो-वर्षा कदम. ६९-७५ किलो- शुभांगी निर्मळ. ७५-८१ किलो-कोमल शिंदे. २३ जुलैचे निकाल-पुरुष फुटबॉल-नगर शहर गोलने विजयी. जलतरण-१०० मी. फ्रीस्टाईल-सागर पालवे, सागर माळी. १०० मी. बटरफ्लाय- खंडेराव शिंदे, रामहरी तिडके. ५० मी. बॅकस्ट्रोक- भास्कर गायकवाड, सागर माळी. ५० मी. बटरफ्लाय-खंडेराव शिंदे, सागर पालवे. खो-खो पुरुष-नगर शहर विजयी. कुस्ती- ५७ किलो-संदीप गर्जे. ६१ किलो-युवराज पवार, बाळासाहेब भापसे. ६५ किलो-समीर शेख. ७४ किलो-राहुल खरात. ८६ किलो- शैलेश रोहोकले. ९७ किलो-अमोल गाढे, मनोज गुंजाळ. कुस्ती महिला-६९ किलो- मनीषा निमोणकर.
जिल्हा पोलिस क्रीडा स्पर्धेच्या समारोपप्रसंगी आयोजित केलेल्या पुरुष १०० मीटर धावणे स्पर्धेत धावताना पोलिस .