आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

11 दिवसांत शेतक-यांना 48 कोटी 77 लाखांची मदत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- कमी पावसामुळे खरीप हंगामात पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या िजल्ह्यातील ५१६ गावांमधील शेतकऱ्यांना ५७ कोटी ६० लाखांची मदत शासनाने जाहीर केली अाहे. गेल्या अकरा िदवसांत ४८ कोटी ७७ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे.

जिल्ह्यात गेल्या वर्षी ५९१ िमलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र केवळ ३८२ िमलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी पावसामुळे जिल्ह्यात खरिपाच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. महसूल िवभागाने िजल्ह्यात पाहणी करुन पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या गावांच्या याद्या तयार केल्या होत्या. १५ िडसेंबरला जाहीर झालेल्या पहिल्या यादीत कमी आणेवारी असलेल्या ३०५ गावांचा समावेश करण्यात आला. त्यानंतर अंतिम आणेवारीत आणखी २११ गावे वाढली. एकूण ५१६ गावे ही कमी आणेवारी असलेली गावे होती. त्याचा अहवाल िजल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवला होता. तो अहवाल िवभागीय आयुक्त कार्यालयाने शासनाला पाठवला होता. कमी पावसामुळे खरीप हंगामातील पन्नास पैशांपेक्षा कमी आणेवारी असलेल्या ५१६ गावांमधील शेतकऱ्यांना ५७ कोटी ६० लाखांची मदत राज्य शासनाने जाहीर केली होती. ही मदत २६ जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याचा िनर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिरायत क्षेत्रासाठी हेक्टरी ४ हजार ५००, बागायती क्षेत्रासाठी हेक्टरी ९ हजार रुपये व फळबागांसाठी हेक्टरी १२ हजार रुपये अशी मदत जाहीर झाली होती. जिल्ह्यात खरिपाचे ४ लाख हेक्टर क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्र आहे. यंदा कमी पावसाची झळ िजल्ह्यातील २ लाख ८२ हजार ४५३ हेक्टर क्षेत्राला बसली आहे. या बाधित क्षेत्राला राज्य शासनाने ५७ कोटी ६० लाखांची मदत जाहीर केली होती. त्यानुसार गेल्या ११ िदवसांत ४८ कोटी ७७ लाखांची मदत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाली आहे. गेल्या आठवड्यात २१ कोटी ३३ लाख ३७ हजारांची रक्कम मदत म्हणून जमा झाली होती.आतापर्यंत ८५ टक्के मदत वितरित करण्यात आली आहे.
नुकसानग्रस्त गावे
खरिपाचे जिल्ह्यात २ लाख ८२ हजार ४५३ हेक्टर क्षेत्र बाधित झालेले आहे. त्यात शेवगाव (३४), नेवासे (१३), राहाता (२४), संगमनेर (१३८), पाथर्डी (८०), कोपरगाव (१६), नगर (५),राहुरी (१७), पारनेर (३१) व अकोले (१५८) ही गावे बाधित आहेत.