आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Divya Marathi Abhiyan: Let's Become Nagar Green And Garden City

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी अभियान: नगर बनवूया हरित व उद्यानांचे शहर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: सावेडी भागात तयार करण्यात आलेल्या गंगा उद्यानात मोठे वृक्ष नाहीत. त्यामुळे हे उद्यान ओकेबोके वाटते. राहुल विळदकर यांनी ड्रोनच्या साहाय्याने काढलेले हे हवाई छायािचत्र उद्यानाची सद्य:स्थिती सांगण्यास पुरेसे आहे.
नगर - नगर शहरात जी उद्याने आहेत ती नावापुरतीच उरली आहेत. एक सिद्धिबाग वगळता इतर उद्यानांत मोठी झाडेच नसल्याने त्यांना बागा कशा म्हणाव्यात, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
बाग म्हटले की डोळ्यांसमोर काय येते? कडेने दाट झाडी, सावलीत नागरिकांना विसावण्यासाठी ठेवलेले बाक, मुलांना खेळण्यासाठी विविध आकार व प्रकारांची खेळणी व सर्वत्र पसरलेली हिरवळ...नगरमध्ये अशा फक्त तीन बागा आहेत. त्यातही सिद्धिबाग वगळता इतर उद्यानांत मोठी झाडे नाहीत. सर्वात प्रथम सर्व उद्यानांत देशी व सावलीचे वृक्ष लावण्याची मोहीम राबवण्याची गरज आहे. सर्वात जुन्या सिद्धिबागेतच फक्त दाट झाडी आहे. मात्र, येथील खेळणी व इतर सुविधांची स्थिती वाईट आहे. त्यात सुधारणा झाली, तर हे उद्यान नागरिकांच्या गर्दीने फुलून जाईल.

सावेडीतील गंगा उद्यानाची थोड्याफार प्रमाणात बरी आहे. मध्यवर्ती शहरातील सिद्धिबाग चांगल्या पद्धतीने विकसित होणे गरजेचे आहे. बालिकाश्रम रस्त्यावरील महालक्ष्मी उद्यानासह शहरातील, तसेच केडगाव उपनगरातील लहान-मोठी उद्यानेदेखील विकसित झाली पाहिजेत, अशीच नगरकरांची अपेक्षा आहे. ही अपेक्षा पूर्ण करण्यासाठी महापालिकेने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
पुढे वाचा संग्राम जगताप काय म्हणतात..