आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'दिव्य मराठी - एक सेल्फी सन्मानाची' स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दैनिक दिव्य मराठी आयोजित चैतन्य ट्रॅव्हल्स प्रायोजित 'एक सेल्फी सन्मानाची' या स्पर्धेतील विजेत्यांना 'दिव्य मराठी' कार्यालयात मंगळवारी सकाळी पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.

महिला दिनी प्रसिध्द झालेल्या जाहिरात पुरवणीत वाचकांना अावडलेल्या जाहिरातीमधील घोषवाक्य त्यासाेबत आई, बहीण, पत्नी अथवा आपल्या मुलीबरोबर काढलेला सेल्फी "दिव्य मराठी'ने व्हॉटस् अपद्वारे स्पर्धकांकडून मागवला होता. या स्पर्धेला वाचकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तब्बल हजार ८७७ स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. लकी ड्रॉद्वारे काढलेल्या दहा भाग्यवान विजेत्यांची नावे मार्चच्या अंकात प्रसिध्द करण्यात आली होती. मंगळवारी सकाळी या विजेत्यांना दैनिक दिव्य मराठी कार्यालयात पुरस्कार देण्यात आले. यावेळी 'दिव्य मराठी'चे ब्यूरो चिफ मिलिंद बेंडाळे, जाहिरात व्यवस्थापक नीलेश सोनवणे, वितरण उपव्यवस्थापक प्रमोद गायकवाड, प्रायोजक चैतन्य ट्रॅव्हल्सचे संचालक िकशोर मरकड आदी उपस्थित हाेते. जमिला शेख, निर्मला गांधी, कन्हैया मुनोत, गुरूदत्त नवाळे, संजय बगाडे, रुपाली गोरे, सतीश मिसाळ, श्वेता पितळे या विजेत्यांना मरकड यांच्या हस्ते पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.

दैनिक दिव्य मराठीने अल्पावधीत वाचकांची मने जिंकली. आज घराघरात दिव्य मराठी पोहोचला आहे. या वृत्तपत्राने पर्यटन क्षेत्राला नेहमीच प्राधान्य दिले. नगर जिल्ह्यासह आजूबाजूच्या पर्यटनस्थळांची माहिती दिव्य मराठीने वाचकांपर्यंत पोहोचवली. 'अतुल्य अहमदनगर' या कॉफीटेबल बुकद्वारे नगरच्या पर्यटनस्थळांची माहिती दिव्य मराठीने राज्यभर पोहोचवली, असे मरकड म्हणाले. सूत्रसंचालन अविनाश कराळे यांनी केले, तर आभार सोनवणे यांनी मानले.

छायाचित्र: दैनिक दिव्य मराठीच्या वतीने आयोजित 'एक सेल्फी सन्मानाची' या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. (डावीकडून) ब्युरोचिफ मिलिंद बेंडाळे, रूपाली गोरे, जमिला शेख, श्वेता पितळे, निर्मला गांधी, गुरूदत्त नवाळे, प्रायोजक किशोर मरकड, सतीश मिसाळ, संजय बगाडे, कन्हैया मुनोत.
बातम्या आणखी आहेत...