आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE : बालेकिल्ल्यातच काँग्रेस सदस्य नोंदणीत पिछाडीवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - एकेकाळी बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यात काँग्रेसला सभासद नोंदणीचा एक लाखाचा आकडाही पार करता आलेला नाही. दुसरीकडे तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षाने मात्र साडेतीन लाख सदस्य नोंदणी करत काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात मुसंडी मारली आहे. विशेष म्हणजे क्रियाशील काँग्रेस सदस्यांची नोंदणी अवघी साडेसहा हजार आहे, तर भाजपच्या क्रियाशील सदस्यांची संख्या ३० हजारांच्या पुढे गेली आहे. 
 
एकेकाळी नगर जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, गेल्या काही वर्षांत हा बालेकिल्ला काँग्रेसच्या वतनदारांनी आपल्या मतदारसंघापुरताच मर्यादित ठेवला आहे. स्वातंत्र्य चळवळीला मोठा हातभार नगर जिल्ह्यातील काँग्रेसजनांनी लावला होता. रावसाहेब पटवर्धन, सहजानंद भारती, बाळासाहेब भारदे, बाळासाहेब विखे, गोविंदराव अादिक यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांनी जिल्ह्यात काँग्रेस पक्ष रुजवला. मात्र, त्याच काँग्रेसची आता जिल्ह्यात पुरती वाताहात झाली आहे. 
 
नगर जिल्ह्यात काँग्रेसचे दीर्घकाळ वर्चस्व होते. सत्तेतून पायउतार होताच गेल्या तीन वर्षांत काँग्रेसमधील मोजकेच पदाधिकारी कार्यकर्ते जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरले, तेही फोटो काढण्यापुरतेच. जयंती पुण्यतिथीसाठीदेखील मोजकेच काँग्रेसजन एकत्र येतात. त्यामुळे पक्षात मोठी मरगळ आली आहे. विशेष म्हणजे राज्याचे विरोधी पक्षनेते असलेले राधाकृष्ण विखे हे काँग्रेसचे आहेत. त्यांनीदेखील पाहिजे तेवढे जिल्ह्याच्या पक्ष संघटनेत लक्ष दिल्याने पक्षाची वाताहात झाल्याचे चित्र आहे. 
 
स्वातंत्र्य चळवळीत नगरच्या भुईकोट किल्ल्यात पंडित जवाहलाल नेहरु, काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष मौलाना आझाद यांच्यासह अखिल भारकीय काँग्रेस कार्यकारिणीच्या बारा सदस्यांना ठेवण्यात आले होते. याच किल्ल्यात पंडित नेहरुंनी ग्रंथलेखन केले. त्यामुळे नगरच्या इतिहासात काँग्रेसचा मोठा वाटा आहे. एकेकाळी राज्याच्या देशाच्या राजकारणातदेखील नगर जिल्ह्यातील काँग्रेस नेत्यांचा मोठा दबदबा होता. 
 
सध्या जिल्ह्यात काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, राधाकृष्ण विखे भाऊसाहेब कांबळे असे तीन आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी बहुतेक आमदार काँग्रेसचेच होते. 
 
आता काँग्रेसला पक्षाच्या सभासद नोंदणीसाठीही तारेवरची कसरत करावी लागत आहे. गेल्या दोन वर्षांत काँग्रेसच्या ८२ हजार ४८० सभासदांची नोंदणी झाली आहे. त्यातही क्रियाशील सदस्यांची संख्या अवघी साडेसहा हजार आहे. त्यातुलनेत तीन वर्षांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजपने जिल्ह्यात साडेतीन लाख सभासद नोंदणी केली आहे. भाजपचे १९८५ मध्ये साडेआठ हजार सदस्य होते. विशेष म्हणजे पक्षाने चिन्हावर राज्यात प्रथमच नगरपालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत चिन्हावर नऊ सदस्य निवडून आले होते. उपनगराध्यक्षपदी दिलीप गांधी यांची निवड झाली होती. ३० वर्षांपूर्वी साडेआठ हजार सदस्य असलेल्या भाजपने आतापर्यंत साडेतीन लाख सदस्य नोंदणी केली आहे. नगर जिल्ह्यात भाजपने इतिहासात प्रथमच मोठी सदस्य संख्या उभी केली आहे. 
 
सदस्य नोंदणी थांबली 
काँग्रेसने आतापर्यंत हजार ३९१ बूथवर ८२ हजार ४८० सभासदांची नोंदणी केली. गेल्या दोन वर्षांत झालेली ही नोंदणी आहे. अॉगस्टपासून सदस्य नोंदणीची प्रक्रिया थांबली असून, २० ऑगस्टपर्यंत तालुकाध्यक्ष बूथ अध्यक्षांची निवड होणार आहे.
'' जयंतससाणे, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस. 
 
पुढील स्लाइडवर, ऑनलाइन नोंदणी-प्रा.भानुदास बेरड... 
बातम्या आणखी आहेत...