आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कौशिकी चक्रवर्ती, अतुलकुमार उपाध्ये यांची शनिवारी मैफल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - दरवर्षी प्रमाणेच दैनिक दिव्य मराठीच्या अहमदनगर आवृत्तीच्या पाचव्या वर्धापनदिनानिमित्त दैनिक दिव्य मराठी, पुण्याची व्हायोलिन अॅकॅडमी अहमदनगरमधील सरगमप्रेमी मित्रमंडळातर्फे येत्या शनिवारी (२६ नोव्हेंबर) आजच्या पिढीतील लोकप्रिय गायिका कौशिकी चक्रवर्ती यांच्या सुश्राव्य गायनाची सुरेल मैफल आयोजित करण्यात आली आहे. नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्सवर ही मैफल रंगणार आहे.

पंडित अजय चक्रवर्ती यांची कन्या असलेल्या कौशिकी या पतियाळा घराण्याची परंपरा यशस्वीपणे पुढे नेत आहेत. शास्त्रीय गायनात सध्या सर्वाधिक लोकप्रिय गायकांत त्यांचा समावेश आहे. त्यांच्याबरोबर पंडित भास्करबुवा बखले पंडित श्रीधर पार्सेकर यांच्या परंपरेतील व्हायोलिन वादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या व्हायोलिन वादनाचा आनंदही रसिकांना घेता येणार आहे. त्यांना तोलामोलाची तबल्यावर साथ पंडित मुकेश जाधव करणार आहेत.

'स्वरझंकार' कार्यक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. पहिल्या वर्षी प्रख्यात संतूरवादक पंडित शिवकुमार शर्मा, दुसऱ्या वर्षी प्रसिद्ध बासरीवादक पंडित हरिप्रसाद चौरसिया यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्याला नगरकरांनी मोठा प्रतिसाद दिला. या वर्षीही हा कार्यक्रम नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे सायंकाळी सहा वाजता रसिकांच्या उपस्थितीत सुरू होणार आहे.

नगरकर वाचकांच्या प्रतिसादामुळे दैनिक दिव्य मराठीच्या अहमदनगर आवृत्तीने यशस्वीपणे सहाव्या वर्षात पदार्पण केले आहे. वर्धापनदिनानिमित्त दरवर्षी नगरकर रसिकांसाठी दर्जेदार कार्यक्रम सादर करण्याची परंपरा 'दिव्य मराठी'ने कायम ठेवली आहे.
बातम्या आणखी आहेत...