आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आसमंत उजळले, दीपोत्सवात नगर रंगले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- लक्ष लक्ष दिव्यांनी उजळलेले आसमंत, आतषबाजीच्या विविध रंगांनी प्रकाशमयी झालेले आकाश असा मनोहारी आविष्कार रविवारी रात्री उशिरापर्यंत अनुभवयास मिळाला..

प्रकाशाचा उत्सव असलेला दिवाळीचा सण नगर शहर आणि जिल्ह्यात मोठय़ा उत्साहात साजरा होत आहे. दिवाळीमुळे संपूर्ण शहरात सध्या चैतन्याचे, मांगल्याचे वातावरण आहे.

रविवारी सायंकाळी पारंपरिक पद्धतीने घरोघरी, तसेच व्यापारी पेढय़ांवर लक्ष्मीपूजन करण्यात आले. पूजा झाल्यानंतर संपूर्ण शहर फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून निघाले. रात्री उशिरापर्यंत फटाक्यांच्या आवाजाने अवघे शहर दणाणून गेले होते.

अंधारातून प्रकाशाकडे नेणारा दीपावलीचा उत्सव नव्या इच्छा, आकांक्षाचे प्रतीक असतो. दीपोत्सवातील सर्वांत महत्त्वाचा दिवस लक्ष्मीपूजनाचा. लक्ष्मीच्या पूजनाने व्यवसायात बरकत येते अशी र्शद्धा आहे. व्यापारी पेढय़ांवर रविवारी मोठय़ा उत्साहात लक्ष्मीपूजन करण्यात आले. घरोघरीही पारंपरिक पद्धतीने विधिवत पूजा करण्यात आली. आकाशकंदील व विजेच्या माळा यामुळे अवघे नगर उजळून निघाले आहे.

अंगणात सडा टाकून रेखाटलेल्या रांगोळ्या, पणत्यांनी केलेली सजावट, शुभेच्छांची देवघेव, फराळाची निमंत्रणे यामुळे सध्या उत्सवी वातावरण आहे. नवे कपडे घालून लक्ष्मीपूजनाचे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिकांनी माळीवाडा, चितळे रस्ता, प्रोफेसर कॉलनी चौक, दिल्ली गेट, भिस्तबाग आदी ठिकाणी रविवारी सकाळी मोठी गर्दी केली होती. लक्ष्मीपूजन, पाडवा व भाऊबीजेसाठी मिठाई खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती.

यावर्षी समाधानकारक पाऊस पडल्याने ग्रामीण भागात आनंदाचे वातावरण आहे. नगरची बाजारपेठ ग्रामीण भागातील ग्राहकांवरच अवलंबून आहे. यंदा बाजारपेठेत मोठी उलाढाल झाली. शहरातील नोकरदार वर्गानेही कपडे, इलेक्ट्रॉनिक वस्तू व फर्निचरच्या दुकानांमध्ये गर्दी केली होती. वाहनांच्या शोरूममध्येही मोठी गर्दी होती.

सुर्शाव्य संगीताची मेजवानी

दिवाळीनिमित्त रूचकर फराळाबरोबर कर्णमधुर संगीताच्या मेजवानीचा आनंद चोखंदळ रसिकांनी लुटला. शहरात विविध ठिकाणी गाण्यांच्या मैफली झाल्या. कानसेनांनी त्यांना गर्दी केली होती.

बालिकार्शम रस्त्यावरील डॉ. अंशू व डॉ. महेश मुळे यांनी मधुकरराव चौधरी यांचे ब्रrावीणावादन, हर्षद भावे यांचे तबलावादन व कल्याण मुरकुटे यांच्या हार्मोनियम वादनाची मैफल निमंत्रितांसाठी आयोजित केली होती.

आकाशवाणी अहमदनगर केंद्राचे कार्यक्रमप्रमुख प्रदीप हलसगीकर यांनी त्यांच्या निवासस्थानी काव्य-गायन-वादनाचा कार्यक्रम आयोजित केला. डॉ. धनर्शी खरवंडीकर, शैलेंद्र गांधी, पवन नाईक यांनी गाणी म्हटली; तर डॉ. मधुसूदन बोपर्डीकर यांनी हार्मोनियमवर, तर रवी लेले यांनी व्हायोलिनवर काही रचना सादर केल्या. तबल्याची साथ हर्षद भावे यांनी केली. ज्येष्ठ कवी चंद्रकांत पालवे व प्रा. डॉ. चं. वि. जोशी यांनी कविता सादर केल्या. डॉ. देविप्रसाद खरवंडीकर यांनी लक्ष्मीपूजनाचे महत्त्व सांगून मराठी व संस्कृतमधील दिवाळीविषयीची कविता म्हटली.

सावेडी येथील ज्येष्ठ नागरिक मंच, चैतन्य फाउंडेशन व सरगमप्रेमी मंडळाच्या वतीने आयोजित ‘एक दिवाळी पहाट वेळी’ या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. राजेश दातार, हेमंत वाळूंजकर, पद्मजा लांबरूड व मेघना सहस्रबुद्धे यांनी रसिकांना खिळवून ठेवले.

कार्यक्रमाची सुरुवात ‘प्रभात समयी’ या गीताने झाली. आधी बीज एकले, मन शुद्ध तुझं, दोन घडीचा डाव, रानात सांग कानात आपुले नाते, गोमू माहेरला जाते, शब्दापासून कळले अशा गीतांनी हा कार्यक्रम रंगत गेला. कार्यक्रमाची निर्मिती प्रशांत पांडव यांनी केली होती. आनंद देशमुख यांच्या निवेदनाने कार्यक्रमाची शोभा वाढवली. प्रास्ताविक अनंत देसाई यांनी, तर सूत्रसंचालन सायली देशपांडे यांनी केले.