आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरात पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजेंचा दणदणाट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील चौकाचौकांत डीजेच्या तालावर गोविंदांनी बुधवारी सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत धुडगूस घातला. पोलिसांच्या नाकावर टिच्चून डीजेच्या दणदणाटात पार पडलेल्या दहिहंड्यांतून आगामी गणेशोत्सवाची झलक नगरकरांना अनुभवयास मिळाली.

र्शीकृष्ण जन्मोत्सव साजरा करताना मंडळांनी डीजेचा अनिर्बंधपणे वापर केला. दाळमंडई, तेलीखुंट, चितळे रस्ता, चौपाटी कारंजा, दिल्ली दरवाजा, गांधी मैदान, माळीवाडा बसस्थानक चौक यासह उपनगरांमध्ये डीजेची धूम सायंकाळपासून सुरु झाली. पोलिसांच्या उपस्थितीत हा प्रकार सुरु असताना मंडळांवर कोणतीही कारवाई करण्यात आली नाही. रस्त्याच्या मध्येच व्यासपीठ उभारून नागरिकांची गैरसोय करण्यात आली. काही मंडळांनी लावलेल्या क्रेनमुळे रस्ता वाहतुकीसाठीच बंद झाले होते. वाहनांवर डीजेच्या साऊंड बॉक्सचे इमले रचण्यात आले होते.

दरम्यान, डीजेच्या आवाजाची पातळी मोजण्यासाठी दोन पथके तैनात आहेत. आवाजाची मर्यादा ओलांडणार्‍या मंडळांविरुद्ध पोलिस अधीक्षकांमार्फत न्यायालयात फिर्यादी देण्यात येतील, असे पोलिस उपअधीक्षक श्याम घुगे यांनी सांगितले.