आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिका जिल्हाधिकारी कार्यालयावर डॉक्टरांचा मोर्चा, विविध मागण्यांसाठी बंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने बुधवारी विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी महापालिका कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. शहरातील सर्व खासगी डॉक्टर या मोर्चात सहभागी झाले होते. रूग्णालयावर होणारे हल्ले, तसेच डॉक्टरांवर दाखल होणाऱ्या खोट्या गुन्ह्यांच्या निषेधार्थ सर्व डॉक्टरांनी सोनोग्राफी ओपीडी बंद ठेवली.
असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विलास जोशी, सचिव डॉ. मिलिंद पोळ यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा निघाला. सोनोग्राफी करणाऱ्या सर्वच डॉक्टरांचा गर्भलिंग निदान करण्यास विरोध आहे. शासनाने सुरू केलेल्या बेटी बचाव अभियानात डॉक्टर उत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. असे असतानाही गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यातील त्रुटींचा गैरवापर करून डॉक्टरांवर खटले दाखल केले गेले. काही अपप्रवृतींकडून रूग्णालयांवर वारंवार हल्ले होतात. त्यासाठी कायद्यातील त्रुटी तत्काळ दुरूस्त कराव्यात. डॉक्टरांवरील हल्ले रोखण्यासाठी तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशा मागण्यांचे निवेदन असोसिएशनच्या वतीने जिल्हाधिकारी अनिल कवडे महापालिका उपायुक्त अजय चारठाणकर यांना देण्यात आले. डॉक्टरांचे हे राज्यस्तरीय बंद आंदोलन होते. देशातील आयएमए, आयआरआयए, एफओजीएस आदी वैद्यकीय क्षेत्रातील संघटनांचा आंदोलनास पाठिंबा होता. मोर्चात डॉ. एस. एस. दीपक, डॉ. सागर झावरे, डॉ. धनंजय वाघ, डॉ. निसार शेख, डॉ. रवींद्र साताळकर, डॉ. अभिजित पाठक, डॉ. बापूसाहेब कांडेकर, डॉ. प्रकाश कांकरिया, डॉ. प्रवीण मुनोत, डॉ. अनघा पारगावकर, डॉ. रवींद्र सोमाणी, डॉ. सुभाष तुवर, डॉ. विनोद मोरे, डॉ. ओंकार कुलकर्णी, डॉ. महेश वीर आदींचा सहभाग होता.

९० टक्के वैद्यकीय सेवा खासगीवर अवलंबून
नगरशहरातील ९० टक्के वैद्यकीय सेवा खासगी वैद्यकीय सेवेवर अवलंबून आहे. महापालिकेला डॉक्टरांचे नेहमीच सहकार्य असते. रस्ता रुंदीकरणात रुग्णालयाचा काही भाग जात असल्यास त्यासाठी सहकार्य करण्याची डॉक्टरांची तयारी आहे. परंतु बेकायदेशीरपणे कारवाई करून रुग्णालय अनधिकृत ठरवल्यास ते बंद करावे लागतील. त्यामुळे मनपा प्रशासनाने रुग्णालयांबाबत सहानुभूतीपूर्वक विचार करावा, अशी मागणी डॉक्टरांनी यावेळी बोलताना केली.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने विविध मागण्यांसाठी िजल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. छाया: उदय जोशी