आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेगावमध्ये दुहेरी हत्याकांड; आखेगाव मार्गावर आढळले दोघांचे मृतदेह

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अहमदनगर- शेवगावमधे आखेगाव मार्गावर दोन मृतदेह आढळून आला आहे. त्यापैकी एक मृतदेह महिलेचा आहे. तसेच एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला आहे. त्याला रुग्णालयात हलवण्यात आले आहे. प्रेमसंबंधातून हे हत्याकांड झाल्याच संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

‍मिळालेली माहिती अशी की, सकाळी फिरणाऱ्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. गंभीर जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. शहरातील लोकांनी या परीसरात खूप गर्दी केली आहे.

मृतदेहांची ओळख पटली आहे. दीपक असे मृत व्यक्तीचे तर मंगल अलकुटे असे महिलेचे नाव आहे. बाळू असे जखमी व्यक्तीचे नाव असून त्याला अहमदनगर येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, उपअधीक्षक अभिजित शिवथरे, एलसीबी पीआय दिलीप पवार घटनास्थळी पोहोचले आहेत.

पुढील स्लाइडवर पाहा.. घटनेशी संबंधित फोटो....
बातम्या आणखी आहेत...