आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिक्स प्रदर्शनातून जैव तंत्रज्ञान दर्शन

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - डॉ. भा. पां. हिवाळे शिक्षण संस्थेच्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या वतीने अहमदनगर महाविद्यालयात दोन दिवस हेलिक्स प्रदर्शन भरवण्यात आले. जैव तंत्रज्ञान क्षेत्रातील करिअरचे प्रकल्प यात सादर करण्यात आले. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. एम. एस्सी. व बी. एस्सी.च्या विद्यार्थ्यांनी त्यासाठी मोलाचे योगदान दिले.

या प्रदर्शनात लाइव्ह एक्सपरिमेंट व प्रोजेक्ट, डीएनए ऑब्झर्व कसा केला जातो, लाइव्ह सेल कल्चर दाखवण्यात आले. फॉरेन्सिक लॅबमध्ये डीएनएचे फिंगर टेक्निकसह नाशिक येथील सेवाज प्रकल्पाच्या वेस्ट वॉटर सिस्टिमचे मॉडेल र्शीकांत कनोजिया व वैभव खाडे यांनी सादर केले. फायटो रेमिडिएशनचा प्रकल्प अंकिता जते व शकुंतला जाधव यांनी बनवला होता. एचआयव्ही इन्फेक्शनचा प्रकल्प कोमल एखंडे व अश्विनी खापरे यांनी तयार केला. कॅन्सर सेलचा प्रकल्प रवी बुडूर व विशाल सोनवणे यांनी सादर केला. एसजीएस पेज कोमल गुंड, स्वप्नाली घुले, प्रियंका पायमोडे यांनी बनवले. प्लांट टिशुज कल्चर तंत्र किमया खंडागळे, सुचिता जाधव यांनी बनवले. ट्रॅजेनिक प्लांट देवयानी सोनवणे, अमरिन नेमाणे, प्रिया चोथे यांनी सादर केला.

शंभर टक्के नोकरीची खात्री
जैव तंत्रज्ञान विभागातील एम. एस्सी.च्या विद्यार्थ्यांना 100 टक्के नोकरी मिळते. महिको सीडस् व अश्वमेध बायोटेक कंपनीने काही विद्यार्थ्यांना निवडले. विद्यार्थी प्रकल्प तयार करायला ज्या कंपन्यांमध्ये जातात तेथे त्यांना कंपनी पेमेंट करते. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजीसाठी (नवी दिल्ली) स्नेहा भारव्दाजची निवड झाली. अनुदान नसताना प्राचार्य आर. जे. बार्नबस व संस्थाचालकांमुळेच विद्यार्थ्यांना अद्ययावत सुविधा पुरवण्यात आल्या आहेत.’’ डॉ. एन. आर. सोमवंशी, समन्वयक, जैव तंत्रज्ञान विभाग.

करिअरची चांगली संधी
या प्रदर्शनामुळे जैव तंत्रज्ञानातील प्रॅक्टिकलचा अनुभव मिळाला. या क्षेत्रात करिअरच्या किती संधी उपलब्ध आहेत, हे या प्रदर्शनामुळे समजले. बारावीनंतर मी जैव तंत्रज्ञान क्षेत्रात करिअर करण्याचे ठरवले आहे.’’ विनिता रूपवते, ऑक्झिलिअम कॉन्व्हेंट हायस्कूल.