आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. महांडुळे यांना कृषिकन्या पुरस्कार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- केडगाव येथील डॉ. शारदा प्रशांत महांडुळे यांना कृषिकन्या पुरस्कार बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या संचालिका सुनंदा पवार यांच्या हस्ते नाशिक येथे नुकताच प्रदान करण्यात आला.
महाराष्ट्र शासन कृषी व पणन विभाग, श्री स्वामी सर्मथ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट व पीव्हीसी प्रतिष्ठान संचलित, कृषी विकास परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसर्‍या अखिल भारतीय कृषी साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. या सोहळ्यात कृषिमंत्री राधाकृष्ण विखे, श्री स्वामी सर्मथ गुरुपीठाचे अण्णासाहेब मोरे, साहित्यिक भास्कर चंदनशिवे आदी यावेळी उपस्थित होते.

प्रणव हॉस्पिटल, मीरा मेडिकल फाउंडेशन व दुर्वांकूर च्यवनप्राशच्या माध्यमातून डॉ. महांडुळे आयुर्वेदिक शेती संकल्पना राबवत आहेत. गर्भवती स्त्रियांसाठीच असलेल्या जगातील पहिल्या चवनप्राशची संशोधन निर्मिती डॉ. महांडुळे यांनी केली आहे. गर्भसंस्काराच्या सीडी प्रकाशन व पुस्तकांचे लेखनही त्यांनी केले आहे. मानचिन्ह, प्रशस्तीपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.