नगर- अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीने देण्यात येणार्या पुरस्कारासाठी नगरमधील दोघांची निवड झाली आहे. डॉ. धनर्शी खरवंडीकर व डॉ. सोमनाथ मुटकुळे यांना यावर्षी परिषदेच्या वतीने सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष मोहन जोशी यांनी मंगळवारी दिली. पुरस्कार वितरण येत्या 14 जूनला मुंबईतील माटुंगा येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात होणार आहे.
नाट्य परिषदेच्या वतीने दरवर्षी ज्येष्ठ व र्शेष्ठ कलाकारांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येते. नाट्यसंगीतासाठी पोषक कार्य करणार्या व्यक्तीस मंगला नारायण पाटकर पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. यंदा हा पुरस्कार नगर येथील डॉ. धनर्शी खरवंडीकर यांना जाहीर झाला. रंगभूमी व्यतिरिक्त अन्य क्षेत्रात भरीव काम करणार्या व्यक्तीस राजाराम शिंदे पुरस्कृत नाट्यमंदार पुरस्काराने गौरवण्यात येते. यावर्षी हा पुरस्कार संगमनेरचे डॉ. सोमनाथ मुटकुळे यांना जाहीर झाला आहे.
डॉ. धनरश्री खरवंडीकर यांनी ‘नाट्यसंगीत’ या विषयात पीएच. डी. मिळवली आहे. ज्येष्ठ गायिका व अभिनेत्री जयमाला शिलेदार यांच्या मार्गदर्शनाखाली कीर्ती शिलेदार यांच्या समवेत त्यांनी विविध संगीत नाटकांत भूमिका साकारल्या आहेत. नाट्यसंगीतातील त्यांचे प्रावीण्य व जाण सर्वर्शूत आहे. बंदिश सांगीतिक कला प्रतिष्ठानच्या माध्यमातून वर्षभर त्या नगरमध्ये विविध उपक्रम घेतात. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गायकांची नवी पिढी तयार होत आहे.
डॉ. सोमनाथ मुटकुळे यांनी सामाजिक वास्तवावर प्रकाश टाकणार्या अनेक एकांकिका व नाटकांचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. नाट्यकला व वैद्यकीय सेवेच्या माध्यमातून त्यांनी विविध समाजपयोगी उपक्रम राबवले आहेत.
नाट्य परिषदेच्या या पुरस्कारांमुळे नगर शाखेचा मोठा सन्मान झाल्याची प्रतिक्रिया येथील रंगकर्मी सतीश लोटके यांनी व्यक्त केली. शाखेच्या कार्याला पाठबळ व ज्येष्ठांचा सन्मान झाल्याची भावना शाखेच्या सर्व पदाधिकार्यांनी व्यक्त केली. परिषदेचे अध्यक्ष जोशी, दीपक करंजीकर, लता नार्वेकर आदींनी पुरस्कारार्थींचे अभिनंदन केल्याची माहिती प्रसाद बेडेकर यांनी दिली.