आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संरक्षित शेतीला एकात्मिक शेतीची जोड द्यावी- डॉ.किरण कोकाटे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहुरी- शेतकरी व शास्त्रज्ञ यांच्यातील दरी कमी करून तंत्रज्ञान शेतक- यांच्या शेतावर राबवणे या संकल्पनेवर आधारित शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची कृषी विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील विविध तालुक्यांमध्ये स्थापना करण्यात आली आहे. बदलत्या हवामानामध्ये जास्त उत्पादन घेण्यासाठी संरक्षित शेती करणे गरजेचे झाले. या संरक्षित शेतीचे तंत्रज्ञान शेतक- यांपर्यंत जाण्यासाठी विद्यापीठांतर्गत संरक्षित शेती शेतकरी-शास्त्रज्ञ मंच स्थापन करणे हा एक स्तुत्य उपक्रम आहे. या संरक्षित शेतीला एकात्मिक शेतीची जोड द्यावी, असे प्रतिपादन संचालक विस्तार शिक्षण डॉ. किरण कोकाटे यांनी केले.
राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागातील काटेकोर शेती विकास केंद्र अंतर्गत संरक्षित शेती शेतकरी- शास्त्रज्ञ मंच स्थापन कार्यक्रम उत्साहात पार पडला. त्यावेळी डॉ. कोकाटे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून राहुरीचे तालुका संरक्षित शेती संघाचे अध्यक्ष भास्करराव वरघुडे होते. कुलगुरू डॉ. तुकाराम मोरे यांच्या संकल्पनेतून संरक्षित शेती शेतकरी-शास्त्रज्ञ मंचाची स्थापना करण्यात आली. राज्यात या प्रकारचा हा पहिला शेतकरी-शास्त्रज्ञ मंच आहे.
व्यासपीठावर संचालक संशोधन डॉ. राजेंद्र पाटील, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रकाश तुरबतमठ, वनस्पतिशास्त्र विभागप्रमुख डॉ. रावसाहेब भारूड, ‘आत्मा’चे प्रकल्प उपसंचालक संभाजी गायकवाड, हिंजवडी येथील अभिनव फार्मसी ग्रुपचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके, तालुका कृषी अधिकारी एन. आर. रोकडे, राहुरी तालुका संरक्षित शेती संघाचे सचिव आर. एन. गायकवाड, संदीप डेरे, जलसिंचन व निचरा अभियांत्रिकी विभागप्रमुख डॉ. सुनील गोरंटीवार, काटेकोर शेती विकास केंद्राचे प्रमुख संशोधक प्रा. नरेंद्र फिरके उपस्थित होते.
वरघुडे म्हणाले, राहुरी तालुक्यात आम्ही 48 पॉलिहाउसची उभारणी केली आहे. निर्यातक्षम मालाचे शेतक- यांनी पॉलिहाउसमध्ये उत्पादन घेतले, तर संरक्षित शेती शेतक- यांना वरदान ठरणार आहे. उद्घाटनप्रसंगी अभिनव फार्मर्स ग्रुपचे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके यांचे शहरी भागासाठी भाजीपाला व फुलपीक पुरवठा यावर व्याख्यान झाले. प्रास्ताविक डॉ. तुरबतमठ यांनी केले. डॉ. सुनील गोरंटीवार आणि डॉ. नरेंद्र फिरके, आत्माचे प्रकल्प उपसंचालक गायकवाड, बोरुडे, रायभान गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले. संरक्षित शेती शेतकरी-शास्त्रज्ञ मंचामध्ये राहुरी तालुक्यातील 45 शेतकरी सदस्य झाले आहेत. सूत्रसंचालन करून हेमंत जगताप यांनी आभार मानले.