आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. कलाम यांच्या पुस्तकांना मोठी मागणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दिवंगतमाजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या निधनानंतर त्यांच्याविषयी अधिक जाणून घेण्याची उत्सुकता विद्यार्थ्यांमध्ये वाढली अाहे. त्यामुळे डॉ. कलाम यांचे चरित्र त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांना मागणी वाढली आहे. नगरचे लेखक भास्कर देशमुख यांनी लिहिलेल्या "डॉ. अब्दुल कलाम' या पुस्तकाच्या तर तब्बल ६०० प्रती मागील काही दिवसांत खपल्या.

डॉ. कलाम यांच्याविषयी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या बातम्या, लेख यामुळे त्यांच्या पुस्तकांविषयी औत्सुक्य वाढले आहे. नगरच्या दीक्षा पब्लिकेशनने डॉ. अब्दुल कलाम या नावाचे पुस्तक खास विद्यार्थ्यांसाठी प्रकाशित केले आहे. नगरच्या भास्कर देशमुख यांनी हे छोटेखानी चरित्र लिहिले आहे. या पुस्तकाला चांगली मागणी आहे. अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना देण्यासाठी आपल्या ग्रंथालयासाठी या पुस्तकाची खरेदी केली.

डॉ. कलाम यांची मूळ इंग्रजीतील पुस्तके मराठीत अनुवादित झाली आहेत. त्यातील "माझी जीवनयात्रा' हे सुप्रिया वकील यांनी भाषांतरित केलेले, "गव्हर्नन्स फॉर ग्रोथ इन इंडिया' हे मनोज अंबिके यांनी भाषांतरित केलेले, "टर्निंग पॉइंट' हे अंजली नरवणे यांनी भाषांतरित केलेले पुस्तक चांगले खपते आहे. डॉ. कलाम यांचे "अग्निपंख' हे माधुरी शानभाग यांनी अनुवादित केलेले आत्मचरित्र अनेकांनी आपल्या संग्रही ठेवले आहे. नवनीत प्रकाशनाचे "स्वप्ने साकारती', तसेच मनोज अंबिके यांचे "असे घडवा तुमचे भविष्य', "प्रज्वलित मने'ही पुस्तकेही सध्या शहर जिल्ह्यात चांगली खपत आहेत. नगरचे भास्कर देशमुख यांनी मुलांसाठी लिहिलेल्या छोटेखानी चरित्राच्या ६०० प्रती संपल्या

प्रेरणादायी चरित्र
तंत्रज्ञान, अवकाश संशोधनात डॉ. कलाम यांचे योगदान, तर अमूल्यच आहे. काव्य, संगीत, कला क्षेत्रातही त्यांचा रूची होती. त्यांच्या पुस्तकांना सध्या मोठी मागणी आहे. नगर शहरातील अनेक शाळांनी, समाजसेवी संस्थांनी डॉ. कलाम यांची पुस्तके आवर्जून खरेदी केली. स्नेहीजनांना भेट देण्यासाठीही ही पुस्तके विकत घेणारे अनेकजण नगरमध्ये आहेत.'' वाल्मिककुलकर्णी, उदय एजन्सीज, नगर.
साहित्य
बातम्या आणखी आहेत...