आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पदवीधर’साठी भाजपतर्फे डॉ. पाटील 16 ला अर्ज भरणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - विधानपरिषदेच्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार डॉ. प्रशांत पाटील यांना जिल्ह्यात मोठे मताधिक्य मिळवून देऊ, असे जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी सांगितले. डॉ. पाटील १६ ला नाशिक येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. 

शहर भाजप कार्यालयात पदवीधरचे उमेदवार डॉ. पाटील यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत प्रा. बेरड बोलत होते. विभागीय संघटनमंत्री किशोर काळकर, पाथर्डीचे नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, रवी बोरावके, प्रसाद ढोकरीकर, युवराज पोटे, श्याम पिंपळे, राजेंद्र म्हस्के, रमेश पिंपळे, प्रकाश चित्ते, अशोक खेडकर, सूर्यकांत मोरे, दिलीप भालसिंग, सिताराम भागरे, विवेक नाईक, दादा बोठे, नितीन कापसे, विक्रम तांबे, बाबा सानप आदी यावेळी उपस्थित होते. 

बेरड म्हणाले, राज्य केंद्र सरकारने केलेल्या विकासकामांमुळे जिल्ह्यातील भाजप संघटन मजबूत झाले आहे. नगरपालिका निवडणुकांतील विजयी घोडदौडीमुळे कार्यकर्त्यांत उत्साह आहे. पदवीधर निवडणुकीत डॉ. पाटील यांच्या विजयात नगर जिल्ह्याचा सिंहाचा वाटा असेल. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासह विभागातील सर्व मंत्री, खासदार आमदार अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत, असे प्रा. बेरड यांनी सांगितले. 
बातम्या आणखी आहेत...