आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वेड्या लोकांनीच इतिहास घडवला..., डॉ. अनिल सहस्रबुद्धे यांचे प्रतिपादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - लेखणीच्या सामर्थ्याने देवेंद्रसिंग वधवा यांनी व्यवस्थेच्या विरोधात भाष्य करुन परिवर्तनाची हाक दिली आहे. आक्रोश करणारे लोक समाजाला वेडे वाटतात. मात्र, अनेक वेड्या लोकांनीच इतिहास घडविला आहे. उशीर कधीही झालेला नसतो. प्रयत्न केल्यास परिवर्तन होते, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल सहस्रबुध्दे यांनी केले. 
 
देवेंद्रसिंग वधवा यांच्या ‘परिवर्तन तुमच्याच हाती’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी डॉ. सहस्रबुध्दे बोलत होते. याप्रसंगी डॉ. संभाजी पटारे, आर्किटेक्ट अशोक काळे, प्रकाशक जयंत देशपांडे, रघुनाथ ठोंबरे, प्रा. खासेराव शितोळे, सुधीर मेहता, साहित्यिक टी. एन. परदेशी, सुरेश परदेशी, वि. ग. सातपुते आदी मान्यवर उपस्थित होते. 
 
‘जादूची कांडी’ या पहिल्या पुस्तकास वाचकांनी दिलेल्या भरघोस प्रतिसादानंतर वधवा यांनी परिवर्तन तुमच्याच हाती या पुस्तकात भ्रष्टाचार समाज व्यवस्थेशी निगडीत प्रश्नांवर बोट ठेवले आहे. पाहुण्यांचे स्वागत जस्मितसिंग वधवा यांनी केले. प्रास्ताविकात हरजितसिंग वधवा यांनी देवेंद्रसिंग यांच्या लेखनाचा प्रवास सांगितला. पंजाबी भाषिक असून मायबोली मराठीतून लिहिलेले हे पुस्तक वाचकांच्या पसंतीस उतरेल, असे ते म्हणाले. 
 
देवेंद्रसिंग म्हणाले, लोकशाहीमध्ये धंदेवाईकपणा आल्याने देश भ्रष्टाचाराने पोखरला जात आहे. प्रत्येक राजकारणी स्वार्थासाठी पुढे येत असल्याने मन दु:खी होत असून, ही खदखद या पुस्तकात व्यक्त करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतरदेखील नागरिकांच्या पदरी निराशाच आली आहे. अन्न, वस्त्र निवारा या मूलभूत गरजा भागवण्यासाठीच अनेक नागरिक धडपडत आहेत. ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे. 
 
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन डॉ. अमोल बागूल यांनी केले, तर आभार सनी वधवा यांनी मानले. यावेळी बलजिंदरसिंग सेठी, मोहनसिंग सेठी, एम. एच. वधवा, रामसिंग कथुरिया, मनीषाकौर वधवा, डॉ. सिमरनकौर वधवा, गगनप्रितकौर वधवा, सहेजकौर वधवा, परमजीतकौर बंग, प्रदीप पंजाबी, देवेंद्रसिंग माखीजा, गुप्ता आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 
बातम्या आणखी आहेत...