आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डॉ. मोने हल्लाप्रकरणी तिघांना अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - कोर्टगल्ली परिसरातील डॉ. श्रीकांत मोने यांच्यावर हल्ला करून चोरीचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी तिघांना पुण्यातील हडपसर भागात अटक केली.

सिराज अलीमउद्दीन काझी (30, काझी गल्ली, तख्ती दरवाजामागे), नजीम ऊर्फ समीर ऊर्फ सोनू मुश्ताक कुरेशी (21, झारेकर गल्ली, सबजेल चौक), संतोष भानुदास शिंदे (21, खडकी, ता. नगर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. 7 ऑक्टोबरला रात्री या तिघांनी डॉ. मोने यांच्या घरी चोरीचा प्रयत्न केला होता. डॉ. मोने यांनी आरडा-ओरड केल्याने आरोपी पसार झाले होते. सिराज याने डॉ. मोने यांच्या घरी फर्निचरचे काम केले होते. त्याचा पुतण्या डॉ. मोने यांच्या घरी चालणार्‍या नर्सरीत शिकतो. त्यामुळे सिराजला डॉ. मोनेंच्या घराची माहिती होती. नजीमच्या मदतीने सिराजने चोरीची योजना आखली. संतोष हा हमाली काम करणारा असून नजीमच्या संपर्कातून तो या गुन्ह्यात सहभागी झाला. शुक्रवारी कोतवाली पोलिस पथकाने या तिघांना पुण्यातील हडपसर परिसरात अटक केली.