आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Drainage Tender Stop For Technical Problem , Ahmednagar Municipal Corroration

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नालेसफाईच्या फेरनिविदेला तांत्रिक अडचणींचा खो!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर: शहरातील नालेसफाईसाठी मागवण्यात आलेल्या फेरनिविदा शुक्रवारी उघडण्यात आल्या. मात्र, तांत्रिक अडचणींचे कारण पुढे करून निविदांना खो देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आल्याने नालेसफाई पुन्हा संशयाच्या भोवर्‍यात सापडली आहे.
मनपाने नालेसफाईसाठी मागील आठवड्यात ऑनलाइनऐवजी जुन्या पद्धतीने निविदा मागवल्या होत्या. पोकलेन असणार्‍या बेस्ट कन्स्ट्रक्शन, र्शीकांत कर्डिले, नंदू धाडगे व विशाल एन्टरप्रायजेस या ठेकेदारांनी निविदा सादर केल्या. निविदा उघडताना ठेकेदारांना निमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळे निविदा प्रक्रिया बेकादेशीर राबवण्यात आली, अशी तक्रार बेस्ट कन्स्ट्रक्शनने केली. ही तक्रार आयुक्त संजय काकडे व महापौर शीला शिंदे यांच्यापर्यंत गेल्याने फेरनिविदा मागवण्याची वेळ प्रशासनावर आली. फेरनिविदा शुक्रवारी उघडण्यात आल्या. नंदू धाडगे, र्शीकांत कर्डिले, बेस्ट कन्स्ट्रक्शन, विशाल एन्टरप्रायजेस या अगोदरच्या ठेकेदारांबरोबरच स्वामी इंजिनिअरिंग अँँड कन्स्ट्रक्शन अशा पाच ठेकेदारांनी निविदा सादर केल्या होत्या. उपायुक्त स्मिता झगडे, मुख्य लेखाधिकारी प्रदीप शेलार व घनकचरा विभागप्रमुख एन. एस. पैठणकर यांच्यासह सर्व ठेकेदारांच्या उपस्थितीत या फेरनिविदांचे तांत्रिक लिफाफे उघडण्यात आले. तांत्रिक अडचणी असल्याने दरपत्रकाचे लिफाफे उघडण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला. ठेकेदारांनी साक्षांकित कागदपत्रे दिली आहेत. मात्र, शेलार यांनी मूळ कागदपत्रांची मागणी केली. त्यामुळे संतापलेल्या ठेकेदारांनी कागदपत्रे खोटी आहेत असे लेखी द्या, मगच आम्ही मूळ कागदपत्रे सादर करतो. तथापि, अधिकार्‍यांनी काहीही न ऐकता फेरनिविदेला खो देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठेकेदारांनी केला.