आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘डीआरडीए’च्या संकेतस्थळावर दिशाभूल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे यांनी जिल्हा परिषदेची बहुतेक माहिती संकेतस्थळावर अपडेट केली आहे, परंतु ग्रामीण विकास यंत्रणेच्या पानावर प्रकल्प संचालकांच्या दुर्लक्षामुळे बहुतेक माहिती जुनीच आहे. सामान्य जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या इंदिरा आवाससारख्या महत्त्वपूर्ण योजनेच्या सूचना तर इंग्रजी भाषेत आहेत. सभेचे इतिवृत्तही प्रसिद्ध केले गेले नाही. त्यामुळे हे संकेतस्थळ दिशाभूल करणारे ठरत आहे.
ग्रामीण विकास यंत्रणेची स्थापना १९८२ मध्ये झाली. ग्रामीण भागातील दारिद्रयरेषेखालील जीवन जगणाऱ्या कुटुंबातील लोकांचे राहणीमान उंचावणे हे अत्यंत महत्त्वाचे काम जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा करते. या संस्थेकडून दारिद्रय निर्मूलन कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि त्यावर देखरेख ठेवण्याचे काम केले जाते. जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. याच संकेतस्थळावर ग्रामीण विकास यंत्रणेसाठी स्वतंत्र लिंक देण्यात आली आहे. ग्रामीण विकास यंत्रणेवर क्लिक केल्यानंतर स्वतंत्र पान उघडले जाते. त्यावर राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मागास क्षेत्र अनुदान निधी, इंदिरा आवास योजना, राजीव गांधी निवारा आणि रमाई आवास योजना आदी योजनांची माहिती देण्यात आली आहे. ही यंत्रणा गरीब, तसेच दारिद्रय्रेषेखाली जीवन जगणाऱ्यांसाठी काम करणारी यंत्रणा आहे, पण इंदिरा आवास योजनेच्या मार्गदर्शक सूचना इंग्रजीत दिल्या आहेत. लाभार्थी यादी दिसते, पण भाषा संकेतांकात दिसते. राजीव गांधी योजनेची तर माहितीच उपलब्ध नाही. सद्यस्थितीचा लेखाजोखा या संकेतस्थळावर नाही. २०१४-२०१५ मधील माहितीच उपलब्ध होते. जिल्हा दक्षता सनियंत्रण सभेची कोणतीही माहिती संकेतस्थळावर नाही. सभेचे इतिवृत्त देण्याची तसदीही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामीण विकास यंत्रणेचे संकेतस्थळ दिशाभूल करणारे ठरत आहे. प्रकल्प संचालकांचे याकडे दुर्लक्ष असून सामान्य जनतेला या संकेतस्थळावरून योजनांचा फारसा बोध होणार नाही.
बातम्या आणखी आहेत...