आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

योजनांच्या दुरुस्तीसाठी लागणार पावणेतीन कोटी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्याततीव्र टंचाईची स्थिती निर्माण झाल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. टँकरसाठी उदभव उपलब्ध करून जनतेच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी १४ प्रादेशिक पाणी योजनांना जीवदान देण्यासाठी सुमारे कोटी ७५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. यासाठी जिल्हा परिषदेने जिल्हा नियोजन समितीकडे पाठवलेल्या प्रस्तावाला दोन दिवसांत मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात जूननंतर दीर्घकाळ पावसाने दडी मारल्याने दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यासाठी प्रशासनाने सात लाखांवर जनतेसाठी टँकरने पाणी उपलब्ध करून दिले. परंतु, टँकर भरण्यासाठीचे स्रोत कोरडे पडल्याने पाणीपुरवठा करण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील चार दिवसांत पावसाने हजेरी लावल्याने रब्बीच्या पेरणीला मुहूर्त मिळाला परंतु, तलाव अजूनही कोरडेच आहेत. त्यामुळे शेवटच्या घटका मोजत असलेल्या प्रादेशिक पाणी योजनांना जीवदान देण्याचा पर्याय प्रशासनाने निवडला. जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जाणाऱ्या प्रादेशिक पाणी योजना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणामार्फत चालवल्या जाणाऱ्या योजनांना दुरुस्ती देखभालीची गरज असल्याचे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाला कळवण्यात आले. या योजनांना जीवदान दिल्यास लाखो जनतेच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. नवीन पंपिंग मशिनरी बसवणे, पाइपलाइन दुरुस्ती, टँकर भरण्यासाठी उदभव पॉइंट निर्माण करणे, विद्युत उपांगांची दुरुस्ती करणे या कामांसाठी जिल्हा परिषदेकडे निधी शिल्लक नाही. त्यामुळे २७ ऑगस्ट २०१४ रोजी राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार टंचाई कालावधीत तातडीच्या उपाययोजना म्हणून उपलब्ध असलेल्या टक्के निधीतून प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांच्या दुरुस्तीची कामे प्रस्तावित करण्यात आली आहेत. शुक्रवारी जलव्यवस्थापन समितीच्या सभेत प्रस्तावाची टिप्पणी ठेऊन त्याला मंजुरी घेण्यात आली. त्यानंतर हा प्रस्ताव तातडीने जिल्हा नियोजन समितीच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला. योजनानिहाय दुरुस्ती खर्चाचे अंदाजपत्रक कोटी ७० लाखांवर पोहोचले आहे. परंतु, तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने जिल्हा प्रशासन दोन दिवसांत या प्रस्तावाला मंजुरी देण्याची शक्यता आहे.

स्थानिक समित्या स्थापन झाल्याने प्रादेशिक पाणी योजना जिल्हा परिषदेमार्फत चालवल्या जातात. परंतु, काही महिन्यांपूर्वीच जिल्हा परिषदेने स्थानिक समित्या गठीत करण्याचा आग्रह धरून गटविकास अधिकारी स्तरावर खाते उघडण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे योजनांवरील ठेकेदारांना वेळेत बिले अदा होत नसल्याने योजना अडचणीत आल्या होत्या. त्यातच योजनांना मोठ्या प्रमाणात दुरुस्तीची गरज असताना जिल्हा परिषदेकडेही निधी शिल्लक नाही. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीकडे दुरुस्तीच्या खर्चाचा प्रस्ताव पाठवल्याने समाविष्ट असलेल्या गावांना दिलासा मिळाला आहे.

१८३गावांना दिलासा
मिरी-तिसगाव२२ गावे (पाथर्डी), आखोणी २२ गावे (कर्जत), शहरटाकळी २४ गावे (शेवगाव), शेवगाव - पाथर्डी ५४ गावे (शेवगाव) बुऱ्हाणनगर प्रादेशिक योजनेतील ४४ गावे (नगर) अशा १८३ गावांना योजनांच्या दुरुस्तीमुळे दिलासा मिळाला आहे.

इतर योजनांवर मेहेरनजर केव्हा?
जिल्ह्यात ४३ प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आहेत. त्यापैकी पाच प्रादेशिक पाणीपुरवठा योजना गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषद चालवत आहे. स्थािनक समिती गठीत झाल्यामुळेच या योजना हस्तांतर होऊ शकल्या नाहीत. पण इतर योजना स्थानिक जनतेच्या प्रतिसादामुळे समित्यांकडे हस्तांतर झाल्या. या योजना चालवताना समित्यांना मोठी कसरत करावी लागत आहे. परंतु पुन्हा एकदा लाडक्या योजनांच्या दुरुस्ती खर्चासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हा नियोजन समितीकडे प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे इतर योजनांवरही प्रशासनाने मेहेरनजर दाखवून दुरुस्ती देखभालीसाठी हातभार लावावा, अशी मागणी लोकप्रतििनधींकडून होत आहे.

योजना निहाय दुरुस्तीची कामे
मिरी-तिसगावयोजना-पंपिंग मशिनरी बसवणे, वांजोळी जलशुद्धिकरण केंद्रावरील पंपिंग मशिनरी बसवून पॅनेल दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती करणे, बुऱ्हाणनगर योजना पंपिंग मशिनरी दुरुस्ती, पाइपलाइन दुरुस्ती, शेवगाव-पाथर्डी योजना पंप मोटार नवीन बसवणे, पंपिंग मशिनरी बसवणे, विद्युत साहित्य दुरुस्ती, शहर टाकळी योजना जॅकवेल ट्रान्सफार्मर दुरुस्ती अतिरिक्त ट्रान्सफार्मर बसवणे, निमगाव गांगर्डा योजना पंपिंग मशिनरी बसवणे, आखोणी योजना पंपिंग मशिनरी बसवणे, राशीन जलशुद्धिकरण केंद्र दुरुस्ती पाइपलाइन दुरुस्ती आदी दुरुस्तीचा प्रस्तावात समावेश करण्यात आला.