आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हप्ते घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याची चालक-मालक (अॅपे रिक्षा) चालकांची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - अनधिकृत खासगी रिक्षाचालकांना अभय देऊन हप्ते घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रजा सेवा चालक-मालक (अॅपे रिक्षा) संघटनेतर्फे वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आले.
खासगी पांढरा रंग असलेल्या रिक्षांना काळा-पिवळा रंग देऊन पिवळी नंबर प्लेट तयार करुन शहरात बेकायदेशीर प्रवासी वाहतूक वाढली आहे. नियमाप्रमाणे कर भरुन रिक्षा व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक रिक्षाचालकांना व्यवसाय करणे कठीण झाले आहे. अनधिकृत खासगी रिक्षांमधून प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षाचालकांना वाहतूक शाखेच्या पोलिसांचा आशीर्वाद असल्याचा आरोप संघटनेतर्फे करण्यात आला आहे.

खासगी रिक्षा प्रवासी वाहतूक करत असताना पकडल्यास त्यांच्यावर कायद्याप्रमाणे दंडात्मक कारवाई होवून रिक्षाचे १२० दिवसांकरिता निलंबन करण्यात येते. अशा खासगी रिक्षांवर दोन पेक्षा जास्त केसेस झाल्यास त्याचे नोंदणीपत्र आरटीओ मार्फत रद्द केले जाते. परंतू शहर वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक विनापरवाना चालवलेल्या जाणाऱ्या अनधिकृत रिक्षांवर दुर्लक्ष करत आहे. काळी-पिवळ्या रंगाची खासगी रिक्षा पकडल्या गेल्यास वाहतुक पोलिस रिक्षाचालकाचे लायसन्स कागदपत्रे तपासता नाममात्र दंड आकारुन रिक्षा सोडून देतात. कारवाई होणार असल्याची पुर्वसुचना देखील हप्तेखोर पोलिस रिक्षाचालकांना देतात. खाजगी अनधिकृत रिक्षाचालकांकडून पोलिस हप्ते घेत असल्याने शहरात अनाधिकृत रिक्षांचा सुळसुळाट झाला असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष बबन बारस्कर, सचिव विष्णू आंबेकर, उपाध्यक्ष भैय्या पठाण, अमोल पतंगे, उबेद शेख, भगवान जगताप, विष्णू आंबेकर, कलीम पठाण, शफीक बागवान, बबलू खोसला, शहाजहान पठाण, शंकर विघावे, यासीन शेख, अतुल वाघ, जमीर शेख, अहमद शेख, सादिक पठाण, नवनाथ वाळके आदि उपस्थित होते.
अनधिकृत खासगी रिक्षाचालकांना अभय देऊन हप्ते घेणाऱ्या पोलिसांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी प्रजा सेवा चालक-मालक (अॅपे रिक्षा) संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली.
बातम्या आणखी आहेत...