आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण जनता होरपळून निघाली आहे. दुष्काळावर कायमस्वरूपी उपाययोजनांची गरज आहे. त्यासाठी यापुढील काळात जलसिंचनाच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन आमदार अरुण जगताप यांनी केले.
नगर तालुक्यातील मांडवे येथे स्व. आसाराम पिंपळे विचार मंचातर्फे आयोजित विविध पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष सुनील पंडित होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती सदस्य पोपटराव निमसे, माजी सरपंच बाळासाहेब निमसे, भाजप महिल आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्ष अर्चना राळेभात उपस्थित होते. प्रारंभी सतीश महाराज निमसे यांच्या हस्ते आमदार जगताप यांना ग्रामभूषण, तर प्रतिकूल परिस्थितीत मुलींना उच्च शिक्षण दिल्याबद्दल गावातील संपतराव निमसे व त्यांच्या प}ी लताबाई निमसे यांना कर्तव्य पालकाचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
आमदार जगताप म्हणाले, नगर जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामध्ये नगर, र्शीगोंदे या तालुक्यांमध्ये दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. दुष्काळ निवारणासाठी सरकार कटिबद्ध आहे. शेतकर्‍यांना जनावरांच्या चार्‍याबरोबरच पिण्याचा पाण्याची कमतरता भासू दिली जाणार नाही. त्यासाठी आपण स्वत: प्रय}शील आहोत. दुष्काळ निवारणासाठी यापुढील काळात तात्पुरत्या उपाययोजना करण्यापेक्षा कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची आता नितांत गरज आहे. त्यासाठी गुजरात राज्याच्या धर्तीवर जलसिंचनाच्या कामांना अधिक प्राधान्य देण्याची गरज आहे. यापुढे अशा कामांना अधिक प्रमाणात आमदार निधी देण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
सरपंच रमेश पिंपळे यांनी उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमास पांडुरंग निकड्र, संजय निमसे, अशोक निकड्र, सुभाष निमसे, अशोक निमसे, पत्रकार ज्ञानेश्वर निमसे, संजय निमसे, बाबासाहेब निमसे, पंढरीनाथ निमसे, बाळासाहेब आरू, शिवाजी निमसे, नानाभाऊ कोकाटे, कल्याण ठोंबरे, सुभाष पठारे, सुभाष पिंपळे उपस्थित होते.