आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टंचाई : उन्हाच्या कडाक्यामुळे टँकरची संख्या वाढली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - उन्हाचा कडाका वाढल्याने ग्रामीण भागातून टँकरच्या मागणीत वाढ झाली आहे. जिल्ह्यातील लाख ४१ हजार ७८५ नागरिकांना २०६ खासगी शासकीय टँकरने आपली तहान भागवावी लागत आहे. सर्वाधिक पाणीटंचाई पाथर्डी पारनेर तालुक्यात जाणवत आहे. दरम्यान, जिल्ह्यातील १४ तालुक्यांपैकी केवळ नेवासे श्रीगोंदे या दोनच तालुक्यांत सध्या पाण्याच्या टँकरच्या शंभर टक्के खेपा होत आहेत.
वाढत्या तापमानामुळे विहिरी, कूपनलिका तलावांतील पाण्याचा साठा कमी होऊ लागला आहे. एप्रिलच्या दुसऱ्या पंधरवाड्यात उन्हाचा कडाका वाढला आहे. रविवारी ३८ अंश सेल्सिअस, तर सोमवारी ४० अंश सेल्सिअसवर पारा पोहोचला. उन्हाचा कडाका वाढताच ग्रामीण भागातून टँकरला मागणी वाढली आहे. दक्षिणेतील पारनेर, नगर, शेवगाव, पाथर्डी, कर्जत, जामखेड श्रीगोंदे या तालुक्यांतून टँकरच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. बागायती भाग असलेल्या उत्तरेतूनदेखील टँकरची मागणी होऊ लागली आहे.

जानेवारीत जिल्ह्यात अवघे दहा टँकर सुरू होते. फेब्रुवारीत ही संख्या ३० वर गेली. मार्चपासून ही संख्या सातत्याने वाढत गेली. मार्चअखेर जिल्ह्यात तब्बल १७७ टँकर सुरू होते. आता ही संख्या २०० हून अधिक झाली आहे. सर्वाधिक पाणीटंचाई पाथर्डी, पारनेर, जामखेड, शेवगाव नगर या तालुक्यांत जाणवते आहे. मंगळवारअखेर तब्बल २०६ टँकरवर लाख ४१ हजार ७८५ नागरिक अवलंबून होते. १५१ गावे ६३० वाड्या-वस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. श्रीरामपूर, अकोले, राहुरी या तालुक्यांत मात्र अद्यापि टॅँकर सुरू झालेले नाहीत. मे-जून महिन्यांत उन्हाचा कडाका आणखी वाढणार असून, त्याबरोबरच पाणीटंचाईची तीव्रताही वाढेल.

मागणी करूनही टँकर त्वरित मिळत नाही

नऊ तालुक्यांतील ४४२ गावे टंचाईग्रस्त जाहीर करण्यात आले आहेत. या गावांना तातडीने टँकर सुरू करावेत, असे आदेश शासनाने दिले असले, तरी मागणी करूनही अनेक गावांना टँकर मिळालेले नाहीत. पूर्वी मंजुरीचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना होते. आता ते तहसीलदारांना देण्यात आले आहेत. प्रस्ताव आल्यानंतर तहसील कार्यालयातील अधिकारी त्या गावांना भेट देऊन टँकरची आवश्यकता आहे का, याची पाहणी करतो. तोपर्यंत ग्रामस्थांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.