आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Drought Hit Drinkers , Liquor Sell Come Down By 20 Percent

दुष्काळाची झळ मद्यशौकिनांना ,मद्यविक्रीत 20 टक्के घट

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - दुष्काळाची झळ मद्यशौकिनांनाही बसत आहे. त्यामुळे मद्यविक्रीत 20 टक्के घट झाली असून राज्य सरकारचा महसूलही 30 टक्के कमी होण्याची शक्यता आहे.

दुष्काळाचा फटका वाहन बाजार, सराफ बाजार, तसेच अन्य क्षेत्रांनाही मोठ्या प्रमाणात बसला आहे. मद्य उद्योगावरही त्याचा परिणाम झाला आहे. घरीच आस्वाद घेण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे बारमधील गर्दी कमी झाली आहे.
नगर शहरात 80 अधिकृत बार व 50 हून अधिक वाइन शॉप आहेत. बिअर बारमध्ये दररोज 40 हजार ते एक लाखापर्यंत, तर वाइन शॉपमध्ये 50 हजार ते दीड लाखाची उलाढाल होते. वर्षाकाठी शहरात मद्यविक्रीतून अडीच हजार कोटींची, तर ग्रामीण भागात दीड हजार कोटींची उलाढाल होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मद्यविक्रीतून मिळणा-या महसुलाचे यंदा 900 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. गतवर्षी जिल्ह्यात सुमारे 4 हजार कोटींची उलाढाल झाल्याचा अंदाज आहे. यंदा 2 ते 3 हजार कोटींची उलाढाल होईल, असा अंदाज आहे.

शहरातील मद्यविक्रेते दुहेरी संकटात
शहरातील अनेक भागांत मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या मद्याची विक्री केली जाते. त्याचा मोठा फटका वाइन शॉप व हॉटेल व्यावसायिकांना सहन करावा लागत आहे.
*महसूलचे 900 कोटींचे उद्दिष्ट
उत्पादन शुल्क विभागाने मद्यावरील करापोटी शहर व जिल्ह्यातून 900 कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. दुष्काळी भागातून महसूल घटण्याची शक्यता आहे. किमान 20 ते 30 टक्के घट होणार आहे.’’
सीमा झावरे, उपअधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग
*करवाढीमुळे उलाढाल कमी होणार
यंदा मद्याच्या मागणीत 20 ते 25 टक्क्यांनी घट झाली आहे.त्यातच राज्य सरकारने करात वाढ केल्याने मद्य पिणा-यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. अनेकांनी मद्यपान आवाक्यात ठेवले आहे. जुलैत पाऊस झाल्यानंतर मद्य बाजाराला पुन्हा चांगले दिवस येतील.’’ अर्जुन बोरुडे, अध्यक्ष, जिल्हा हॉटेल व परमीट रूम मालक असोसिएशन, नगर