आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाच्या झळा तीव्र, रब्बीही वाया गेल्यात जमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - जिल्ह्यात दुष्काळाच्या झळा अधिक तीव्र झाल्या आहेत. खरीप हंगाम वाया गेल्यानंतर रब्बीही धोक्यात आला आहे. फळबागा, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी टँकरने पाणी घेऊन पिके जगवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तथापि, उत्पादनाच्या तुलनेत अधिक खर्च येणार असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात मागील चार वर्षांपासून कमी पावसामुळे दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. या पावसाळ्यातही समाधानकारक पाऊस झाल्याने खरीप वाया गेला. शेतकऱ्यांनी रब्बीच्या पिकांसाठी मोठा खर्च केला, पण जिल्ह्यातील निळवंडे, मुळा धरणांतील पाणी जायकवाडीला देण्याचा निर्णय झाल्याने रब्बीचे आवर्तन सोडता आले नाही. चांगला पाऊस होईल या आशेवर शेतकऱ्यांनी पेरणी केली, पण त्यांची निराशा झाली. बागायती भागातील विहिरींनी तळ गाठला आहे. तलाव तर भरलेच नाहीत. त्यामुळे जिल्ह्याचे आर्थिक गणित कोलमडले आहे. पावसाचा फटका शेतकऱ्यांबरोबर उद्योगांनाही अप्रत्यक्षरित्या बसला आहे. शासनाने पुढाकार घेऊन शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून जिल्ह्यात पशुपालनाचा व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो. दुष्काळामुळे चाऱ्याचे वाढलेले भाव आणि शासनाच्या धोरणामुळे घसरणारे दुधाचे दर यामध्ये पुन्हा एकदा शेतकरीच भरडला जात आहे. जिल्हा राज्यात सर्वाधिक दूध उत्पादन करणारा जिल्हा असला, तरी दूध उत्पादनातही घट होण्याची चिन्हे आहेत. जिल्ह्यात सुमारे १७ लाख जनावरे आहेत. या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. माणसांनाच पिण्यासाठी पाणी नाही. जनावरांच्या पाण्याचीही तरतूद झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे.

जिल्ह्यात आजही ६६ टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. संगमनेर, कोपरगाव, नेवासे, नगर, पारनेर, पाथर्डी, शेवगाव, कर्जत, जामखेड, श्रीगोंदे या तालुक्यातील ५४ गावे टँकरमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषदेच्या जलव्यवस्थापन समितीने आराखडा सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुरुस्ती देखभालीअभावी बंद पडलेल्या पाणी योजनांना उर्जितावस्थेत आणण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी सुमारे पावणेतीन कोटी प्रादेशिक पाणी योजनांसाठी दिले आहेत. पण राजकीय हस्तक्षेप वाढत असल्याने प्रत्यक्षात कामे सुरू होऊ शकली नाहीत. जिल्ह्याला दुष्काळाच्या तीव्र झळा जाणवू लागल्या असताना चारा छावण्या चारा डेपो सुरू करण्याची मागणी पुन्हा जोर धरू लागली आहे.

दरम्यान, दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्याकडे जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांचे प्रशासनाचे दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे टँकरवर लाखो रूपये खर्च होऊनही दरवर्षी टंचाईच्या झळा वाढतच आहेत. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याबाबत जनजागृती करण्याकडेही फारसे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे अनेक गावांत पाण्याचा अपव्यय होताना दिसत असूनही त्यावर कठोर निर्बंध घातले जात नाहीत.

टँकरवर शेती कशी होणार?
जिल्ह्याच्या उत्तर भागात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. खरिपानंतर रब्बीही वाया गेल्यात जमा आहे. कांदा रोपांसाठी मोठा खर्च केला. पाणी कमी पडल्याने कांद्याची रोपे जळण्याच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे आम्ही हजार रुपये मोजून टँकर घेऊन शेतीला पाणी देण्याचा प्रयत्न केला. पण आर्थिकदृष्ट्या ते परवडणारे नाही.'' अप्पासाहेब गवते, शेतकरी.

सव्वा लाख जनता टँकरवर
जिल्ह्यातील५३ गावे २७४ वाड्या-वस्त्यांना ६६ टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. लाख ३१ हजार ९४७ नागरिकांना टँकरच्या १४८ खेपांच्या माध्यमातून पिण्यासाठी पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. सर्वाधिक १६ टँकर संगमनेरमध्ये, तर शेवगावमध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.

१३ योजनांच्या कामांची निविदा
जिल्ह्यातीलपाच-सहा प्रादेशिक पाणी योजनांच्या १८ कामांच्या दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध झाला. त्यापैकी कामे पाच लाखांच्या आतील असल्याने ती कामे ग्रामपंचायत स्तरावर करण्यात येतील. उर्वरित १३ कामांसाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. १० नोव्हेंबरला निविदा उघडून कामे हाती घेतली जातील. सुरेंद्रकुमार कदम, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा.