आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जूनअखेर केवळ 18 मिलिमीटर पाऊस; शेतकरी धास्तावले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - 7 जून रोजी मृग नक्षत्र सुरू झाले की शेतकर्‍यांची पेरणीसाठी लगबग सुरू होते. यंदा मात्र जून महिना पूर्ण होत आला तरी पाऊस होत नसल्याने शेतकरी धास्तावले आहेत. जिल्ह्यात 18 मिलिमीटर पाऊस झाला असून शेतकर्‍यांनी केवळ कपाशी लागवड केली आहे. तूर, उडीद लागवडीचा हंगाम अटोपला आहे.

दोन वर्षापासून जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने शेतकर्‍यांचे अर्थिक गणित कोलमडले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात 111 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. यावर्षी मात्र अद्यापही पाऊस झाला नसल्याने त्याचा खरीपाच्या लागवडीवर परिणाम झाला आहे. जिल्ह्यात अत्यल्प क्षेत्रावर कपाशाची लागवड झाली असून शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत आहे.
ज्वारी, बाजरी, मका, तूर, उडीद, मूग, याची लागवड करण्याचा कालावधी हा जून महिन्याअखेरचा आहे. यानंतर याची लागवड झाल्यास उत्पन्नात घट होणार आहे.
सोयाबीनसाठी 30 जुलै
योग्य वेळेत सोयाबीनची लागवड झाल्यास अधिक उत्पादन घेणे शक्य असते. मात्र लागवडीचा हंगाम संपल्यास मिळणार्‍या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो. जिल्ह्यात यावर्षी मोठ्या प्रमाणात सोयाबीन लागवड होणार असून 30 जुलैपर्यंतची डेडलाइन आहे.

पावसाची प्रतीक्षा
रब्बी हंगामात गारपिटीमुळे गहू, मका, कांदा या पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकर्‍यांच्या हाती मृग नक्षत्रासाठी मोठी तयारी केली आहे. मात्र या जून संपत आला असला तरी पावसाने हजेरी लावली नाही. यामुळे शेतकर्‍यांची काळजी वाढली आहे.