आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • DSP Yadavarava Patil Latest News In Divya Marathi

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर गावठी पिस्तूल विक्रीचे मोठे रॅकेट उघड

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- ऐन विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत पोलिस उपअधीक्षक यादवराव पाटील यांच्या पथकाने गावठी पिस्तूलविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश केला. मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांना त्यांनी गजाआड केले. निवडणूक आचारसंहिता लागू झाल्यापासून जिल्ह्यात एकूण 10 गावठी पिस्तुले व 60 जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली आहेत, असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी सांगितले.
मध्य प्रदेशातून दोघेजण बसने शहरात गावठी पिस्तुलांची विक्री करायला येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार उपअधीक्षक पाटील यांच्या पथकातील राजू वाघ, संजय इस्सर, भरत डंगोरे, अभय कदम, राम माळी यांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. महारसिंग इंदरसिंग जुनेजा (वय 45, उमर्टी, बलवाडी, ता. वरला, जि. बडवानी) व अनिस सरपत खरते (21, रा. घेगाव, बलवाडी, जि. बडवानी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी विक्रीसाठी आणलेली 7 पिस्तुले व 51 जिवंत काडतुसे पोलिसांना काढून दिली.
ही पिस्तुले आरोपींनी राधाबाई काळे कॉलेजच्या भिंतीलगतच्या झुडुपातील खड्ड्यात लपवलेली होती. पोलिसांनी एकूण दीड लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी अवैध धंद्यांविरोधातही जोरदार मोहीम उघडली आहे.
डीलर'ला अटक
मध्य प्रदेशातून विकत आणलेली अनेक पिस्तुले पोलिसांनी आजवर जप्त केली. परंतु आता प्रथमच मध्य प्रदेशातील डीलरच पोलिसांना गवसले आहेत. महारसिंग इंदरसिंग जुनेजा हा पिस्तूल बनवणारा कारागीर आहे. एक पिस्तूल बनवायला त्याला एक महिन्याचा कालावधी लागतो, अशी माहिती तपासात समोर आली. त्यांनी आजवर कोणाला, किती आणि कशासाठी पिस्तुले विकली, याबाबत आता पोलिस कसून चौकशी करीत आहेत.