आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांगल्या पावसासाठी मुंगी येथे सुदर्शन महायज्ञास प्रारंभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेवगाव - शेवगाव तालुक्यातील मुंगी येथे जगद्गुरू श्रीभगवान श्रीनिम्बर्काचार्य मंदिरात अधिक मासानिमित्त भव्य सुदर्शन महायज्ञास सोमवारी विधवित पूजा करून भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. श्रीक्षेत्र मुंगी येथील भगवान श्रीनिम्बर्काचार्य यांच्या जन्मभूमीत पाऊस पडावा, म्हणून सुदर्शन महायज्ञाच्या कार्यक्रमास भक्तिमय वातावरणात सोमवारी सुरुवात झाली. १६ जुलैपर्यंत हा महायज्ञ सुरू राहणार आहे. प्रारंभी सकाळी गावातून डोक्यावर कलश घेऊन भव्य शोभायात्रा काढण्यात आली. त्यामध्ये भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हा कार्यक्रम जगदगुरू श्रीनिम्बर्काचार्य पीठ निम्बार्कतीर्थ सालेमाबाद राजस्थान येथील पीठाधीश्वर श्रीश्रीजी महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत होत आहे.

पीठाचे युवाचार्य श्रीश्यामशरणदेव महाराज यांच्या मधूर रसाळ वाणीतून भक्त प्रल्हाद चरित्र कथेचे मंगळवारी (१४ जुलै) ते १६ जुलैपर्यंत आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ते दुपारी पर्यंत सुदर्शन महायज्ञ तसेच दुपारी ते सायंकाळी पर्यंत भक्त प्रल्हाद कथा होणार आहे. त्याचे आस्था वाहीनविर थेट प्रेक्षपण होणार आहे. आलेल्या भाविकांसाठी दररोज महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, बिहार, दिल्ली आदी राज्यांतून ववििध महंत, भाविक उपस्थित झाले आहेत. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी भक्तगण मुंगी ग्रामस्थांनी नियोजन पूर्ण केले आहे. या धार्मिक कार्यक्रमाचा भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन सेवा समिती ग्रामस्थांनी केले. भव्य मंडप भोजनगृह उभारणीसह परिसर स्वच्छ करण्यात आला आहे.

चांगल्या पावसासाठी वरुणदेवाला साकडे
पावसाळासुरू होऊन महिने उलटून गेला तरी समाधानकारक पाऊस झाला नसल्यामुळे बळीराजासह सर्वच हवालदिल झाले आहेत. पावसाचे आगमन व्हावे म्हणून भव्यदवि्य सुदर्शन महायज्ञाचे आयोजन केले आहे. चांगल्या पावसासाठी वरुणराजाला साकडे घातले आहे.'' श्रीश्यामशरणदेव महाराज, श्रीनिम्बर्काचार्य पीठ, सालेमाबाद, राजस्थान.