आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Due To The Celebration Of The Police Increased Security To Stress

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

उत्सवांमुळे पोलिसांवर बंदोबस्ताचा वाढता ताण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी शनिशिंगणापुरात शुक्रवार ते रविवार असे तीन दिवस भाविकांची गर्दी होणार आहे. शिवाय जिल्ह्यात १२ सप्टेंबरला बैलपोळ्याचा सण उत्साहात साजरा होत आहे. पोळा शनि अमावास्या एकत्र आल्यामुळे शिंगणापुरात गर्दी नवा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे. त्यानंतर १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. अशा एकापाठोपाठ आलेल्या सण, उत्सवांमुळे पोलिस दलावर बंदोबस्ताचा प्रचंड ताण आला आहे. त्यामुळे वरिष्ठ अधिकारी बंदोबस्ताच्या काटेकोर नियोजनात व्यग्र आहेत.

कुंभमेळा पर्वणी काळ शनि अमावास्येचे औचित्य साधून अनेक भाविक शिर्डी शिंगणापूरला भेट देणार आहेत. १७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत गणेशोत्सव साजरा होत आहे. सार्वजनिक तरुण मंडळे आरास, देखावे, तेसच धार्मिक कार्यक्रम आयोजित करतात. ते पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शहरात भाविकांची गर्दी होते. गणेशोत्सव काळात शहरातील वाहतूक सुरळीत सुरक्षित चालावी, वाहतुकीची कोंडी होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मुंबई पोलिस अधिनियमांतर्गत पोलिस अधीक्षक डॉ. सौरभ त्रिपाठी यांनी आदेश जारी केला आहे.

१७ ते २७ सप्टेंबर या कालावधीत तीन चाकी, चारचाकी वाहनांना गांधी मैदान ते चितळे रस्ता, चौपाटी कारंजा ते चितळे रस्ता, माणिक चौक ते भिंगारवाला चौक, अर्बन बँक चौक ते भिंगारवाला चौक, गंजबाजार कॉर्नर ते भिंगारवाला पारशा खुंटमार्गे येणाऱ्या वाहनांकरिता, चांद सुलताना हायस्कूल ते मराठा मंदिर दुकानाकडे येणारा रस्ता डांगेगल्ली या मार्गावर वाहन नेण्यास मनाई करण्यात अाली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास मुंबई पोलिस अधिनियम १९५१ च्या कलम १३१ प्रमाणे मोटार वाहन कायदा कलम १७७ नुसार अपराध ठरेल, असा इशारा डॉ. त्रिपाठी यांनी दिला आहे.

गणेशोत्सवात सायंकाळी ते रात्री १० या वेळेत झेंडीगेट, कोठला नालबंद खुंटाकडून रामचंद्र खुंट, कोंड्यामामा चौक, आडतेबाजार, गंजबाजाराकडून दाळमंडईकडे, नवीपेठेकडून खामकर चौकाकडे, आझाद चौक, माणिक चौकाकडून भिंगारवाला चौक, अर्बन बँकेकडे, नालबंद खुंटाकडून भिंगारवाला चौकाकडे, आझाद चौकाकडून नवीपेठेकडे, दिल्लीगेटकडून चौपाटी कारंजाकडे, दिल्लीगेटमार्गे नीलक्रांती चौकाकडे सर्व वाहनांना प्रवेशबंदी असेल.

असा असेल शिर्डी शनिशिंगणापूरमध्ये बंदोबस्त
^११ते १५ सप्टेंबर हा कुंभमेळ्याचा दुसरा पर्वणीकाळ आहे. त्यासाठी शिर्डीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक, उपअधीक्षक, ११ पोलिस निरीक्षक, ५० सहायक निरीक्षक उपनिरीक्षक, ५८० पोलिस कर्मचारी, गस्ती वाहने, गुजरातची १०० पोलिसांची सीआरपीएफ बटालियन कंपनी असा बंदोबस्त असेल. याच कालावधीत शिंगणापुरात उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक, १७ सहायक निरीक्षक पाेलिस उपनिरीक्षक, २०० पोलिस कर्मचारी कडेकोट निगराणी ठेवणार आहेत. या पाच दिवसांच्या कालावधीत पोलिस अधीक्षकांनी शिंगणापुरात नो पार्किंगचा आदेश जारी केला आहे. याशिवाय गणेशोत्सवाकरिता दौंडहून १०० पोलिसांची एसआरपीएफ कंपनी अतिरिक्त बंदोबस्त म्हणून मागवली आहे. भाविकांनी या काळात पोलिसांना सहकार्य करावे.'' सुरेशसपकाळे, पोलिस निरीक्षक, जिल्हा विशेष शाखा.

पार्किंग व्यवस्था
गणेशोत्सवात दहा दिवस सर्जेपुऱ्यातील रंगभवनसमोर, दिल्लीगेटजवळ घोरपडे हॉस्पिटलसमोरचे पटांगण, बंगाल चौकीजवळ गाडगीळ पटांगण, कोठला झोपडपट्टीत बापूशहा दर्ग्याजवळ, झेंडीगेटमध्ये गैबीपीर पटांगण, गांधी मैदानाजवळ बाळासाहेब देशपांडे हॉस्पिटलजवळ, सिद्धिबागेनजीक जलविहाराजवळ, स्टेशन रोडवर क्लेरा ब्रूस हायस्कूलच्या मैदानावर, जुन्या महापालिका कार्यालयाच्या पाठीमागे भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या मैदानावर, तर लालटाकी रस्त्यावर रेसिडेन्शिअल हायस्कूल ज्युनिअर कॉलेजच्या आवारामध्ये दुचाकी चारचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

अतिरिक्त बंदोबस्त हवा
कुंभमेळ्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश पोलिस कर्मचारी शिर्डी शनिशिंगणापुरात बंदोबस्ताकरिता नेमण्यात आले आहेत. अर्थात यंदाच्या पर्वणीकाळात कुंभमेळ्यात भाविकांची गर्दी तुलनेने कमी असल्यामुळे पोलिसांवर तितका ताण आला नाही. त्यामुळे नाशिकचे सुमारे ४०० पोलिस कर्मचारी गोपाळकाल्याच्या बंदोबस्ताकरिता नगरला आले होते. चार दिवस हे कर्मचारी नगरमध्ये होते. आता ११ ते १३ सप्टेंबरला पर्वणी काळ शनि अमावास्या असल्यामुळे पुन्हा पोलिस बंदोबस्त नेमण्यात आला आहे. तदनंतर गणेशोत्सव येत आहे. हा उत्सव शांततेत पार पडावा, यासाठी राज्य राखीव पोलिस दलाच्या अतिरिक्त तुकड्यांची गरज भासणार आहे.