आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपचारासाठी ताे करवून घ्यायचा अटक! स्‍वत:ला मुख्यमंत्र्यांच्या पीए सागणारा अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- काेपर्डीतील अाराेपींना पुण्याच्या कारागृहात हलवण्याची मागणी करत मुख्यमंत्र्यांच्या स्वीय सहायकाच्या नावाने पाेलिसांना फोन करणाऱ्या अमित कांबळे या ताेतयाला नगर पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्या या कृत्यामागे भलतीच सुरस कहाणी समोर आली आहे. 


अमित कांबळेची दोन्ही मूत्रपिंडे निकामी आहेत. त्याच्या आई-वडिलांचे काही वर्षांपूर्वीच निधन झालेले असून त्याच्या घरात दुसरे कुणीच नाही. डायलिसिससाठी दोन दिवसाआड साडेचार हजार रुपये लागतात. कामधंदा नसल्याने त्याची तजवीज होत नाही. उपचारासाठी त्याने शक्कल लढवली. अमित चक्क कधी मुख्यमंत्र्यांच्या नावे, तर  कधी पोलिस महासंचालकांच्या नावे, तर कधी थेट पोलिस आयुक्तांच्या नावाने फोन करून खोटी माहिती द्यायचा. त्यानंतर पोलिस त्याला अटक करायचे. अटकेनंतर तो आपल्या दोन्ही किडन्या निकामी झाल्याचे पोलिसांना सांगायचा. पोलिसही त्याच्या तपासणीनंतर त्याच्यावर न्यायालयाच्या आदेशानंतर डायलिसिस करायचे. हा प्रकार त्याने वारंवार केला. नगरच्या पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्यानेच ही माहिती पोलिसांना दिली. 

बातम्या आणखी आहेत...