आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टुरिस्ट मॅपमुळे नगरच्या पर्यटनविकासाला मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - देशातील नव्हे, तर आशियातील एकमेव रणगाडा संग्रहालय, अकरा फुटांपेक्षा जास्त उंचीचा विशाल गणेश, सुलताना चांदबिबीच्या शौर्याची गाथा सांगणारा भुईकोट किल्ला, ताजमहालाची संकल्पना ज्यावरून शहाजहान बादशहाला सूचली तो फराहबख्क्ष जलमहाल, हमामखाना असलेला हश्त-बेहश्त महाल, निसर्ग सौंदर्याचं भरभरून दान देणारं डोंगरगण, सामाजिक कार्याचा मानदंड उभा करणारे स्नेहालय, आदर्श गाव हिवरेबाजार अशा विविध स्थळांची ओळख करून देणाऱ्या 'नगर प्रदक्षिणा' या टुरिस्ट मॅपचे प्रकाशन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.

५२५ वर्षांचा गौरवास्पद इतिहास लाभलेल्या नगर शहरात आणि परिसरात अनेक ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक निसर्गरम्य पर्यटनस्थळे आहेत. शिर्डी शनिशिंगणापूर जाणारे-येणारे पर्यटक नगरवरून पुढे जातात, पण येथील पर्यटनस्थळांची माहिती नसल्याने नगरमध्ये थांबत नाहीत. त्यांच्यासाठी हा टुरिस्ट मॅप उपयोगी पडेल.

'नगर प्रदक्षिणा'ची संकल्पना भूषण देशमुख यांची असून चित्रे आरेखन योगेश हराळे यांचे आहे. या उपक्रमासाठी डॉ. महेश डॉ. आशू मुळे, प्रा. अशोक जोगदे, संजय दळवी, अमोल पोळ, मनीष झंवर यांचे सहकार्य लाभले. पाचशे वर्षांहून जुन्या असलेल्या कासीमखानी महाल (नगर निवास) परिसरात जिल्हाधिकारी कवडे यांनी नकाशाचे प्रकाशन केले. यावेळी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरूडे, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, एसीसी अँड एस अर्काइव्हजचे हरिश सागडे, प्रा. अशोक जोगदे, अरूण कडूस आदी उपस्थित होते.

'नगर प्रदक्षिणा' या टुरिस्ट मॅपचे प्रकाशन जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या हस्ते झाले. या वेळी उपजिल्हाधिकारी दत्तात्रेय बोरुडे, एसीसी अँड एस अर्काइव्हजचे हरीश सागडे, चित्रकार योगेश हराळे, अरुण कडूस, भूषण देशमुख आदी उपस्थित होते.