आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदा सॉफ्टवेअर जप्त

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - एमआयडीसीतील निकास सीएनसी इंजिनिअरिंग कंपनीवर रुद्र कॉपीराईट प्रोटेक्टर सर्व्हिसेसच्या पथकाने शुक्रवारी छापा घातला. कंपनीतील संगणकात मास्टर केम सॉफ्टवेअर बेकायदा वापरल्याचे आढळून आले. याप्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. शशांक सुधाकर कुलकर्णी व ऑपरेटर ब्रिजेश नरसिंह अंकम अशी त्यांची नावे आहेत.

अहमदाबादच्या रुद्र कॉपीराईट प्रोटेक्टर सर्व्हिसेसच्या मुंबई येथील पथकाने शुक्रवारी दुपारी अडीचच्या सुमारास निकास कंपनीवर छापा घातला. कंपनीच्या संगणकात मास्टर केम सॉफ्टवेअर विनापरवाना असल्याचे पथकातील अधिकार्‍यांना आढळले. एक संगणक जप्त करण्यात आला आहे. पथकातील प्रमुख अधिकारी जिग्नेश ठक्कर यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिस ठाण्यात कॉपीराईट कायद्यान्वये दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

छापा पडल्याची माहिती समजताच अन्य उद्योजकांनी पोलिस ठाण्यात गर्दी केली. गुन्हा दडपण्यासाठी काहींचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आल्यामुळे त्यांना यश आले नाही. बातमी छापू नका अशी विनंती पत्रकारांनाही करण्यात आली.

नंतर आरोपींना वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक एल. एम. गौंड, पोलिस नाईक मनोहर शेजवळ व अमित महाजन करीत आहेत.