आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रम्य आठवणी: दूरदर्शनमुळे मोठय़ांचे लहानपण अनुभवले...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर- दूरदर्शन या चित्रवाणी माध्यमात काम करताना मोठय़ा माणसांचे लहानपण व तुलनेने लहान असणार्‍यांचे मोठेपण अनुभवता आले, असे प्रतिपादन दूरदर्शनच्या मुंबई केंद्राचे सेवानिवृत्त निर्माते अरुण काकतकर यांनी केले.
संपदा विद्या प्रतिष्ठान व धनसंपदा पतसंस्थेच्या वतीने आयोजित ज्ञानसंपदा व्याख्यानमालेत ‘नक्षत्रांचे दिवस’ या दूरचित्रवाणी माध्यमात अनुभवलेल्या रम्यकाळाचे अनुभव काकतकर यांनी सांगितले. ते म्हणाले, मी दादरच्या डी. एन. वैद्य रोडवरील चाळीत राहणारा सर्वसामान्य कुटुंबातला मुलगा. नॅशनल डिफेन्स अँकॅडमीत पायलट पदासाठी प्रयत्न केले. मात्र, उंचीमुळे अपात्र ठरलो. त्यानंतर र्शीकांत दादरकर यांनी माझी भेट दूरदर्शन केंद्राच्या तेव्हाच्या निर्मात्या सुहासिनी मूळगावकर यांच्याशी घालून दिली. त्यानंतर मी मुंबई दूरदर्शन केंद्रामध्ये रूजू झालो. याच माध्यमातून कविवर्य बा. भ. बोरकर, सुरेश भट, पु. ल. देशपांडे, चंद्रशेखर गाडगीळ, माणिक वर्मा, शिवानंद पाटील, मोगूबाई कुडरुकर, मंगेशकर कुटुंबीय, किशोरी अमोणीकर, स्मिता पाटील, भीमराव पांचाळे, विजय तेंडुलकर, शांता शेळके यांच्यापर्यंत पोहोचू शकलो. कर्तृत्वाने या व्यक्ती फार मोठय़ा होत्या, असे ते म्हणाले.