आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुर्गामाता दौडचा शस्त्रपूजनाने उत्साहात समारोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - राज्यातील तरूणांत राष्ट्र हिंदू धर्माबद्दल प्रेम जागृत व्हावे, म्हणून श्रीशिवप्रतिष्ठानचे संस्थापक ज्येष्ठ हिदुत्ववादी नेते संभाजी भिडे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली नवरात्रोत्सवात गेल्या १८ वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रात दुर्गामाता दौडचे आयोजन केले जात आहे. नगरमध्येही दुर्गामाता दौडचा उपक्रम ११ दिवस राबवला गेला. दररोज सकाळी साडेसहा वाजता शेकडो युवक भगवा ध्वज घेऊन शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून दुर्गामाता दौड काढत. शहरातील विविध देवी मंदिरात दौडचा समारोप होत असे. श्रीरामपूर, जामखेड पाथर्डी तालुक्यातही हा उपक्रम राबवला गेला.

विजयादशमीला दुर्गामाता दौडच्या समारोपासाठी सकाळी हजारो युवक, महिला पारंपरिक वेशभूषेत माळीवाडा बसस्थानक चौकात जमले. शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून ही दौड शहरातील प्रमुख मार्गांवरून कल्याण रस्त्यावरील नेप्ती चौकात आली. शहरात ठिकठिकाणी या दौडचे नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. रस्त्यावर रांगोळ्या काढून, चौकाचौकात फटके वाजून दौडचे स्वागत करण्यात आले. तरुण हातात तलवार घेऊन दौडमध्ये सहभागी झाले होते. या शस्त्रांचे पूजन ठिकठिकाणी केले गेले.

नेप्ती चौकात दौडच्या समारोपप्रसंगी भारतमाता पूजन शस्त्रपूजन करण्यात आले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आमदार संग्राम जगताप, शिवसेना शहरप्रमुख संभाजी कदम, नगरसेवक उमेश कवडे, दत्ता मुदगल, केंद्रे महाराज यांच्या हस्ते विधिवत शस्त्र पूजन करण्यात आले. या वेळी उपस्थित शेकडो युवक महिलांनी भारतमाता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकार केला.
बातम्या आणखी आहेत...