आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळावा भगवानगडावरच; महंतांना मेळावा रोखण्याचा अधिकार नाही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाथर्डी- भगवानगडावरील मेळावा रोखण्याचा महंतांना अधिकार नाही. दसरा मेळावा मंत्री पंकजा मुंडे यांचे उपस्थितीत गडावरच होईल, असा निर्धार मेळावा संयोजन समितीच्या बैठकीत रविवारी करण्यात आला. 
 
येथील गोरे मंगल कार्यालयात शिरुर, पाथर्डी व शेवगाव तालुक्यातील मेळावा समर्थकांची बैठक झाली. अध्यक्षस्थानी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर होते. माजी आमदार दगडू बडे, नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, माजी जि. प. सदस्य सोमनाथ खेडकर, माजी सभापती संभाजीराव पालवे, सतीश पालवे, गोकुळ दौंड, माजी नगराध्यक्ष दिनकर पालवे, सुभाष घोडके, अभय आव्हाड, बीड जि. प. सदस्य रामराव खेडकर व रामदास बडे, मधुसूदन खेडकर, नगरसेवक प्रवीण राजगुरु व नामदेव लबडे, भगवान बांगर, युवा मोर्चाचे अमोल गर्जे, शेवगावचे नगरसेवक अरुण मुुंडे, तुषार वैद्य, अजय भंडारी, बाबासाहेब ढाकणे, नागनाथ गर्जे, पांडुरंग खेडकर, राहुल कारखेले, सुरेश उगलमुगले, जनार्दन वांढेकर, मोहनराव पालवे उपस्थित होते. दोन दिवसांपूर्वी तोडगा काढण्यासाठी गडावर गेलेल्या मुंडे समर्थकांना हाकलून लावत महंतांनी समर्थकांकरवी मारहाणीची भाषा केली. या पार्श्वभूमीवर या बैठकीत प्रमुख वक्त्यांनी महंतावर तोंडसुख घेत वैयक्तिक जीवनावर भाष्य करत गादीवरुन पाय उतार होऊन दुसरीकडे डेरा सच्चा नावाचा गड स्थापन करण्याचा सल्ला दिला. 
 
पालकमंत्र्यांना विसर 
मेळावा गडावर की पायथ्याशी, याबाबत कौल घेतला असता उपस्थितांनी हात उंचावून गडावरच मेळावा घेण्याचा आग्रह धरला. गेल्या वर्षी पालकमंत्री राम शिंदे यांनी पुढील वर्षीचा मेळावा मी स्वत: संयोजक होऊन भव्य-दिव्य करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र, मेळाव्याचा पालकमंत्र्यांना विसर पडल्याचा उल्लेख करत अनेकांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...